यशदा युवती फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सोलापूर : तुमचे नाव 'प्रणिती' (Praniti) आहे का? असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसेच तुमचे नाव 'प्रणिती सुशीलकुमार शिंदे' (Praniti Sushilkumar Shinde) असेल तर सोने पे सुहागाच आहे! कारण यशदा युवती फाउंडेशनच्या (Yashada Yuvati Foundation) माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त 'प्रणिती सुशीलकुमार शिंदे' नाव असणाऱ्यांना सोन्याची नथ तर फक्त 'प्रणिती" नावाच्या महिला व युवतींना आकर्षक पैठणी देऊन त्यांचा सन्मान 9 डिसेंबर रोजी गुरुनानक चौक येथील प्रणिती उद्यानात करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका फिरदोस पटेल (Firdaus Patel) यांनी दिली.
यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका फिरदोस पटेल यांनी मोफत पेट्रोल उपक्रम राबवला होता. त्यावेळी तब्बल 787 जणांनी याचा लाभ घेतला होता. शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा विजयी पताका फडकावली आहे. गोरगरीब व सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विकासकामांमुळे या मतदारसंघातील तळागाळातील व उच्चशिक्षित मतदारांनी सलग तीन वर्षे आमदार शिंदे यांना निवडून दिले आहे.
या विकासकामांचा लेखाजोखा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'प्रणिती सुशीलकुमार शिंदे" नाव असणाऱ्यांना सोन्याची नथ आणि 'प्रणिती" नाव असणाऱ्या महिला व युवतींना आकर्षक पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी महिला व युवतींनी नावाचा पुरावा म्हणून आधारकार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणणे गरजेचे असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.