कोल्हापूर येथील महापारेषण कंपनीच्या अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पदी मूळचे अक्कलकोट तालुक्यातील अतुल चंद्रकांत मणूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर : कोल्हापूर (Kolhapur) येथील महापारेषण (Mahatransco) कंपनीच्या अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पदी मूळचे अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील अतुल चंद्रकांत मणूरकर (Atul Manurkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी पदभार घेतला आहे. 1998 मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर त्यांची नेमणूक झाली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे (Maharashtra State Electricity Board) 2005 मध्ये विभाजन झाले. त्यानंतर महापारेषण कंपनीत ते रुजू झाले. दरम्यान, मुंबई (Mumbai) येथे सांघिक कार्यालयात, त्यानंतर पुणे (Pune), कराड (Karad) व सांगली (Sangli) येथे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी काम केले. आता पदोन्नतीवर अधीक्षक अभियंता (Superintendent Engineer) म्हणून अतुल मणूरकर हे कोल्हापूर येथे रुजू झाले आहेत.
मूळचे अक्कलकोट येथील प्रसिद्ध (कै.) चंद्रकांत मणूरकर यांचे चिरंजीव अतुल मणूरकर यांचे शालेय शिक्षण शहाजी हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी सोलापूर येथे स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका घेतली. मनात पुढील शिक्षणाची इच्छा होती व सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी विद्यालयात प्रवेशही मिळाला होता. परंतु आर्थिक अडचणींमुळे वयाच्या अठराव्या वर्षी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ खापरखेडा, नागपूर येथे त्यांनी नोकरी पत्करली व सब इंजिनिअर या पदावर डिसेंबर 1983 मध्ये रुजू झाले. नोकरी करतानाच त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एएमआयई ही अभियांत्रिकी पदवी 1987 मध्ये प्रथम श्रेणीमध्ये घेतली. नागपूर येथील सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य शाखेतील एम टेक पदव्युत्तर पदवी घेऊन नागपूर विद्यापीठात ते द्वितीय क्रमाकांने उत्तीर्ण झाले.
1998 मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर त्यांची नेमणूक झाली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे 2005 मध्ये विभाजन झाले. त्यानंतर महापारेषण कंपनीत ते रुजू झाले. दरम्यान, मुंबई येथे सांघिक कार्यालयात, त्यानंतर पुणे, कराड व सांगली येथे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी काम केले. आता पदोन्नतीवर अधीक्षक अभियंता म्हणून अतुल मणूरकर हे कोल्हापूर येथे रुजू झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.