सोलापूर : सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असून खते, बियाणे, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर जात आहे. शेतकऱ्यांना मुदतबाह्य खते-औषधे, बियाणांची विक्री, लिंकिंगचा आग्रह, खते असूनही नाही म्हणून सांगण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने सोलापूर जिल्ह्यातील १५ खत दुकानांचा परवाना कायमचा रद्द केला असून दोघांचा परवाना निलंबित केला आहे.
राज्यभरातून कृषी विभागाने जूनअखेर बियाणे, खते व कीटकनाशकांचा २५५ मेट्रिक टन साठा जप्त करण्यात केला असून त्याची अंदाजे किंमत अडीच कोटींपर्यंत आहे. बियाणे, खते या निविष्ठांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी सहायकांच्या निगराणीखाली कृषी सेवा केंद्रांवर त्यांची नियुक्ती करून बियाणे व खतांची विक्री केली जात आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ असे दोन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याठिकाणी आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्याअनुषंगाने भरारी पथकांकडून संबंधित दुकानांची तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही पंढरपूरमधील काही कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन त्याठिकाणचा खतांचा साठा पडताळला.
भरारी पथकांद्वारे कृषी सेवा केंद्रांवर लक्ष
खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना दर्जेदार निविष्ठांच्या विक्रीसंदर्भात सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीसाठी भरारी पथके नेमली असून त्यांच्या माध्यमातून जूनअखेर राज्यातील ८०० हून अधिक दुकानांचा परवाना रद्द तर २४१ जणांचे परवाने निलंबित केले आहेत.
- प्रवीण देशमुख, गुणनियंत्रण अधिकारी (कृषी), महाराष्ट्र
परवाने रद्द व निलंबित झालेली जिल्ह्यातील दुकाने
१) परवाना निलंबित : बसवेश्वर कृषी केंद्र (कुंभारवेस, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर), मे. एनलायझर ॲग्रोसिस्टमस ओपीसी प्रा. लि (पेहे, ता. पंढरपूर)
२) परवाना कायमचा रद्द : मे. तेजदिप कृषी केंद्र (अकोले, ता. दक्षिण सोलापूर), समर्थ कृषी केंद्र व सार्थ कृषी केंद्र (दोन्ही होटगी, ता. दक्षिण सोलापूर), जयकल्याण ॲग्रिकल्चर ॲण्ड फर्टिलायझर्स (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), शिवप्रसाद ॲग्रो एजन्सी (रामपूर, ता. दक्षिण सोलापूर), मल्लिकार्जुन कृषी सेवा केंद्र (वडगाव, ता. दक्षिण सोलापूर), समर्थ कृषी केंद्र (बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर), विराज ॲग्रो एजन्सी (वैराग, ता. बार्शी), अंकिता कृषी सेवा केंद्र (संगवी, ता. अक्कलकोट), अंकुर माहिती व कृषी सेवा केंद्र (बरूर, ता. दक्षिण सोलापूर), आदर्श कृषी केंद्र (कुरघोट, ता. दक्षिण सोलापूर), शिवराज कृषी सेवा केंद्र (निमगाव सीना, ता. माढा), माढेश्वरी कृषी सेवा केंद्र (उपळाई, ता. माढा), महासिद्ध ॲग्रो सेंटर (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) व आरकाज ऑरगॅनिक कृषी केंद्र (मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.