Pig Sakal
सोलापूर

Barshi Nagarparishad : एका दिवसात ३०० वराह जेरबंद करुन पाठविले बार्शीच्या बाहेर!

बार्शी नगरपरिषदेने वराह पकडण्याचे काम ठेकेदारास देताच एका दिवसांत सुमारे ३०० वराह पकडून बार्शीबाहेर पाठवले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बार्शी नगरपरिषदेने वराह पकडण्याचे काम ठेकेदारास देताच एका दिवसांत सुमारे ३०० वराह पकडून बार्शीबाहेर पाठवले आहेत.

बार्शी - शहरातील सार्वजनिक ठिकाणी वराहांचा उच्छाद,नागरिकांचे आरोग्य धोक्यात पण वराह पालक बिनधास्त या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने वराह पकडण्याचे काम ठेकेदारास देताच एका दिवसांत सुमारे ३०० वराह पकडून बार्शीबाहेर पाठवले आहेत. दरम्यान वराह पकडण्याची कार्यवाही सुरु असताना झालेल्या दगडफेकीत तीन कामगार जखमी झाले. बार्शी शहर पोलिस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरु आहे.

शहरात सार्वजनिक ठिकाणी मोकाट वराह वावर वाढत असल्याने नागरिकांच्या तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या याबाबत वराह पालकांची बैठक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी घेऊन वराहाचे पालन स्वतःच्या बंदिस्त जागेत करावे अशी सूचना मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली होती.

या बैठकीचा काहींही उपयोग झाला नाही आणि मोठ्या प्रमाणात वराहांचा वावर सुरुच राहिला, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. अखेर नगरपरिषदेने मोकाट वराह बंदोबस्त निविदा प्रसिद्ध केली.

कायदेशीर रितसर ठेकेदारास मंजूरी देऊन काम देण्यात आले. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या २५ कर्मचाऱ्यांसह ठेकेदाराचे कामगार, तीन वाहने यासह वराह बंदोबस्त मोहीम फत्ते करीत सुमारे ३०० वराह पकडून ठेकेदारास देत बार्शी बाहेर पाठविले आहेत.

वराह बंदोबस्त कार्यवाही सुरु असताना नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचा एक कर्मचारी व ठेकेदाराचे दोन कर्मचारी दगडफेक करुन प्रतिकार केल्यामुळे किरकोळ जखमी झाले आहेत. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आम्ही शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देत आहोत.

- शब्बीर वस्ताद, आरोग्य विभाग प्रमुख,बार्शी नगरपरिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT