लस घेतल्याशिवाय काम मिळणार नाही, अशी भूमिका विडी कारखानदारांनी घेतली आहे. बहुतेक नागरी आरोग्य केंद्रांवर टोकनशिवाय लस टोचली जात आहे.
सोलापूर : कोरोना लस (Covid Vaccine) घेतल्याशिवाय काम मिळणार नाही, अशी भूमिका विडी कारखानदारांनी घेतली आहे. बहुतेक नागरी आरोग्य केंद्रांवर टोकनशिवाय लस टोचली जात आहे. परंतु, लसीअभावी रांगेत उभारूनही अनेकांना लस मिळत नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दाराशा नागरी आरोग्य केंद्रावर विडी कामगारांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, गर्दीमुळे रांगेतून लस मिळणार नाही, या चिंतेतील काही विडी कामगार (Beedi Workers) महिलांनी जवळील कात्रीने रिकाम्या औषधांच्या बॉक्सपासून टोकन बनवून गूपचूप सर्वांना वाटले. (Beedi workers womens made fake tokens to get the corona vaccine-ssd73)
शहरातील विडी कामगारांसाठी मंगळवारी 38 केंद्रांवर लसीकरणाची (Vaccination) सोय करून दिली होती. भावनाऋषी, मुद्रा सनसिटी, जोडभावी, विडी घरकुल व दाराशा या नागरी आरोग्य केंद्रांवर त्यांना ऑन द स्पॉट लस देता येईल, असेही महापालिकेने आदेशात नमूद केले होते. त्या ठिकाणी प्रत्येकी 280 डोस दिले होते. परंतु, विडी कामगारांची संख्या मोठी असून अनेकांना अजूनपर्यंत लस मिळालेली नाही. त्यामुळे विडी कामगारांना हातावरील पोट भरणे मुश्कील झाले आहे. दरम्यान, मंगळवारी विडी घरकुल, जोडभावीसह अन्य नागरी आरोग्य केंद्रांवरील गर्दीचा अंदाज घेऊन अडीचशेहून अधिक कामगार महिलांनी दाराशा नागरी आरोग्य केंद्र गाठले. परंतु, त्या ठिकाणी टोकनशिवाय लस मिळणार नाही, अशी भूमिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली. गर्दी होऊन गोंधळ उडणार नाही हा त्यामागे हेतू होता. त्यानंतर काही विडी कामगार महिलांनी शक्कल लढवत जवळ पडलेल्या औषधांच्या रिकाम्या बॉक्सपासूनच टोकन तयार केले आणि गुपचूप सर्वांना वाटले. हा प्रकार समोर आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाराशा आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या विडी कामगारांनाच लस मिळेल, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. परंतु, काहीवेळाने लसीकरण पुन्हा सुरू करावे लागले.
केंद्रावर दामिनी पथक अन् पोलिस
लहान मुलांना सोबत घेऊन आलेल्या विडी कामगार महिलांनी लस मिळत नसल्याने दाराशा नागरी आरोग्य केंद्रावर आरडाओरड सुरू केली. त्यामुळे काहीवेळ लसीकरण थांबविण्यात आले. गोंधळ वाढत असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर बझार पोलिस आणि पोलिस आयुक्तालयाच्या कंट्रोलला कॉल करून दामिनी पथक व पोलिस कर्मचाऱ्यांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतर गोंधळ शांत झाला, त्या विडी कामगारांकडून आधारकार्ड घेऊन त्यांना पोलिस बंदोबस्तात लस टोचण्यात आली.
सर्वांना लस मिळेल, परंतु गर्दी न करता अंतर ठेवून रांगेत उभारण्यास सांगितल्यानंतर काही विडी कामगार महिलांनी आरोग्य केंद्रावर गोंधळ सुरू केला. नगरसेवकांचेही ते ऐकत नसल्याने पोलिसांना बोलावून त्यांना शांत करावे लागले. काहीवेळाने लसीकरण सुरळीत पार पडले.
- डॉ. सुहासिनी वाळवेकर, वैद्यकीय अधिकारी, दाराशा नागरी आरोग्य केंद्र
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.