Firasta Canva
सोलापूर

प्रदर्शनापूर्वीच "फिरस्त्या'चे अकरा देशांत कौतुक अन्‌ 53 पुरस्कार !

प्रदर्शनापूर्वीच "फिरस्त्या'चे अकरा देशांत कौतुक अन्‌ 53 पुरस्कार !

श्रीनिवास दुध्याल

पुणे आयकर विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या "फिरस्त्या' या मराठी चित्रपटाचे अकरा देशांत कौतुक झाले आहे.

बार्शी (सोलापूर) : पुणे आयकर विभागात (Pune Income Tax Department) सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल मच्छिंद्र भोसले (Vitthal Bhosle) यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या "फिरस्त्या' (Firastya) या मराठी चित्रपटाचे अकरा देशांत कौतुक झाले आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival) प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने 53 पुरस्कार पटकावले आहेत. निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना आत्मविश्वास देणाऱ्या या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. (Before its release, the Marathi film Firastya received fiftythree awards)

सकारात्मकतेचं बीज पेरणारा "फिरस्त्या' चित्रपट. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत यशापर्यंत पोचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादायी कहाणी चित्रपटात आहे. प्रदर्शनापूर्वीच "फिरस्त्या'ने भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया या 11 देशांमधील 24 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण 53 पुरस्कार जिंकलेले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट - 18 पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - 17 पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता - 7 पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पटकथा - 5 पुरस्कार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - 3 पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण - 2 पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट संकलन - 1 असे पुरस्कार मिळालेले आहेत.

"फिरस्त्या'ची फायनॅलिस्ट म्हणून अमेरिका, रशिया, स्वीडन आणि तुर्की या चार देशांमधील चार चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांनी प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून हा चित्रपट बनवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील वांगी नंबर तीन हे दिग्ददर्शक भोसले यांचे मूळ गाव आहे. निर्माती डॉ. स्वप्ना विठ्ठल भोसले यांनी त्यांच्या झुंजार मोशन पिक्‍चर्स संस्थेद्वारे "फिरस्त्या'ची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे प्रमुख कलाकार समीर परांजपे, हरीश बारसकर, मयूरी कापडने आणि अंजली जोगळेकर आहेत. प्रमुख बाल कलाकार आज्ञेश मुडशिंगकर, श्रावणी अभंग, समर्थ जाधव आहेत. पार्श्वगायन आदर्श शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत दिग्दर्शन रोहित नागभिडे, देवदत्त मनीषा बाजी, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे, गीतकार गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख, छायाचित्रण गिरीश जांभळीकर, ध्वनी संयोजन राजेंद्र त्यागी यांनी केले आहे. संघर्षातून यशोशिखराकडे जाणाऱ्या नायकाची गोष्ट असलेला "फिरस्त्या' पाहण्यासाठी आता मराठी रसिक श्रोतेही उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT