bharat patankar over idols found in Sri Vitthal temple social media statement pandharpur Sakal
सोलापूर

Pandharpur Vitthal Idol History : श्री विठ्ठल मंदिरात सापडलेल्या मूर्तींची चर्चा अर्थहीन - डॉ. भारत पाटणकर

मंदिराचा जीर्णोद्धार करताना पुरातन संदर्भाचे संशोधन, जतन करायला हवे

सकाळ वृत्तसेवा

Pandharpur News : श्री विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडलेल्या त्या दोन्ही मूर्तींसंदर्भात काही माध्यमांनी वेगळी चर्चा केली. मात्र त्या मूर्तींचा आणि मूळ श्री विठ्ठल मूर्तीचा काहीही संबंध नसल्याने अशी चर्चा निरर्थक असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

डॉ. पाटणकर यांनी शुक्रवारी (ता. १४) पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठल मंदिराची, तेथे सुरू असलेल्या मंदिर संवर्धन कामाची आणि त्या पुरातन मूर्तींची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, रवी सर्वगोड, नागेश झेंडे आदी उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, विठ्ठल मंदिर नूतनीकरण करताना काही मूर्ती सापडल्या. त्यानंतर त्या मूर्ती मूळ आहेत काय? अशी चर्चा माध्यमातून सुरू झाली होती. येथील इतिहास तज्ज्ञ ॲड. सुधीर रानडे यांनीही या मूर्ती पेशवेकालीन असल्याच्या अंदाज व्यक्त केला.

पेशवेकालीन म्हणजे तो काळ शंभूपुत्र शाहू महाराज यांचा काळ होता आणि त्यावेळी अफजल खान या सारखी संकटे नव्हती. त्यामुळे मूर्तीविषयी तो संदर्भ पुरेसा ठरत नाही. सांस्कृतिक अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत.

तळघरात सापडल्या तशाच मूर्ती मंदिरात प्रवेश करताना दोन्ही बाजूला दिसून येतात. यावरून त्यात नवीन काही नाही असे दिसते. तरीही मूर्ती संदर्भात अशी चर्चा का? सुरू झाली असा प्रश्न पडला आहे. संतांच्या काळात विठ्ठल मूर्ती होती.

त्यांनी प्रत्यक्ष मूर्ती पाहून विठ्ठलाचे वर्णन केले आहे. अभंगातील संदर्भ आणि ते वर्णन आजच्या मूर्तीशी जुळते आहे. त्यामुळे आज मूर्तीच्या मूळ स्वरूपाबाबत चर्चा करणे निरर्थक आहे. विठ्ठलमूर्तीबाबत संत ज्ञानेश्वरांनी विष्णूच्या २४ मूर्तीहून आगळा, असे वर्णन विठ्ठलाचे केलेले आहे. संत नामदेव महाराज यांनीही विष्णू सहस्त्र नामा वेगळा आणि चोवीसा आगळा आहे, असे म्हटले आहे.

संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा याचे वर्णन वेगळे केले आहे. सर्व संतांनी वेगवेगळ्या काळातही विठ्ठलाचे वर्णन एक सारखेच केले आहे. त्यामुळे आता वेगळे काही वर्णन करू नये. जे सगळे स्पष्ट असताना अशी चर्चा अर्थहीन आहे. विठोबाच्या वेगळेपणाला आव्हान दिल्यासारखे आहे, असेही डॉ. पाटणकर म्हणाले.

श्री विठ्ठल हाच बुद्ध असल्याचा संदर्भ जोडणे योग्य नव्हे

विठ्ठल गोप वेषधारी असे वर्णन बहुतांश संतांनी केले आहे. शस्त्र हाती नसलेला श्री विठ्ठल हा एकमेव देव आहे. भारतीय तत्वशास्त्रानुसार विठ्ठलाचे नाते बुद्धाशी जोडलेले आहे. अहिंसक, जाती भेद, लिंगभेद, वर्णभेद असे काहीही न मानणारे हे एक दैवत आहे. वारकरी विचारसरणी, संस्कृती, समानता या आधारे विठ्ठल आणि बुद्ध तत्वात साम्य आहे.

मात्र बुद्ध हाच विठ्ठल असल्याचे जोडणे योग्य नाही, असा दावाही डॉ. पाटणकर यांनी केला. विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाविषयी डॉ. पाटणकर यांनी समाधान व्यक्त केले. हे काम यापूर्वीच व्हायला हवे होते, असे सांगून विठ्ठल मंदिरात अनेक पुरातन शिलालेख आहेत, मात्र हे काम करणारे लोक हे मजूर आहेत, पुरातत्त्व विभागाच्या जाणकार लोकांकडून हे जुने संदर्भ जतन केले जावेत. त्यावर संशोधन व्हावे, अशी अपेक्षा पाटणकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT