Big blow to Shiv Sena in Madha taluka chief devanand bagal resigns for shivsena due to internal factionalism Esakal
सोलापूर

Madha Lok Sabha : माढ्यात शिवसेनेला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीमुळे आणखी एका नेत्याने दिला राजीनामा

Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळी चालू आहे. त्यातच तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी हा राजीनामा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

करमाळा: करमाळा तालुका शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळी चालू आहे. त्यातच तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी हा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाचे समर्थक असलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी दोन दिवसापूर्वीच आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा शिवसेना सचिवांकडे पाठवला आहे. देवानंद बागल यांनी सांगितले, शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष वाढीला मर्यादा येत असल्याने आपण तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना, जातेगाव- टेंभुर्णी रस्ता याच्यासह इतर महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आम्हाला पोचू न देण्याची व्यवस्था केली जात होती. याचाच परिणाम म्हणून करमाळा तालुक्यात शिवसेना वाढू शकली नाही. त्यामुळे आपण शिवसेना पक्षाच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT