सोलापुर-पुणे,मोहोळ-पंढरपुर  sakal
सोलापूर

सोलापुर-पुणे,मोहोळ-पंढरपुर महामार्गावरील ब्लॅकस्पॉट कमी होणे गरजेचे"

राष्ट्रीय महामार्ग झाल्याने इच्छित स्थळी पोहोचण्याच्या वेळात मोठी बचत झाली आहे.

राजेश नागरे

मोहोळ: सोलापूर-पुणे व मोहोळ- पंढरपुर हे राष्ट्रीय महामार्ग चौपदरी झाल्याने दुचाकी सह चार चाकी वाहने सुसाट वेगाने जात आहेत, मात्र या महामार्गावर आवश्यक ठिकाणी तसेच गावाजवळ झेब्रा क्रॉसिंगवर पांढरे पट्टे नसल्याने तसेच जे आहेत ते पुसट झाल्याने मोठे अपघात होत आहेत. या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र अपघात कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नसल्याने आणखी किती बळी गेल्यानंतर उपाय योजना होणार अशी विचारणा आता संतप्त सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांमधून होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग झाल्याने इच्छित स्थळी पोहोचण्याच्या वेळात मोठी बचत झाली आहे. त्यामुळे ठराविक वेगाने दुचाकी व चारचाकी वाहने सुसाट जात आहेत. सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्याच्या हद्दीत अनेक गावे येतात. त्या गावातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावर येण्यासाठी चार ते पाच किलोमीटर आंतर पार करून मग यावे लागते, अपवाद वगळला तर गावाजवळ पांढरे पट्टे ओढलेले नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपण कुठून जायचे ही माहिती होत नाही त्याची चलबिचल होते.त्यामुळे मोठया प्रमाणात अपघात होतात. शेटफळ ते चिंचोली औद्योगिक वसाहती पर्यंतचा सर्विस रोड गायब आहे.या बाबत विविध राजकीय पक्ष,स्वयंम सेवी संस्थांनी तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी आवाज उठविला मात्र प्रशासनाने याची कुठलीच दखल घेतली नाही केवळ कागदी घोडे नाचवणे व आश्वासन देणे या पलीकडे काहीही झालेले नाही.

त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरते आहे याची पोल-खोल होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त अपघात झाले तर तो ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला जातो. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ हद्दीत असे पंधरा ब्लॅक स्पॉट आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांनी संयुक्त बैठक घेऊन यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. महामार्गावरून विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढल्याने हे ही अपघाताचे मोठे कारण आहे.

सोलापुर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हे आहेत ब्लॅक-स्पॉट

सावळेश्वर दर्गा ,अर्जुंसोंड फाटा,लांबोटी -चंदननगर, वडवळ फाटा, कन्याप्रशाला चौक, नरखेड क्रॉस रोड; कचरे पेट्रोल पंप मोहोळ---

यावली क्रॉस रोड

अनगर फाटा फाटा, चिखली टॉवर

हिवरे फाटा

तेलंगवाडी गाव-शेटफळ, माढा- फाटा--

कोळेगाव

सावळेश्वर चौक चंद्रमौळी औद्योगिक वसाहत

हे आहेत मोहोळ- पंढरपुर महामार्गावरील ब्लॅकस्पॉट

नारायण चिंचोली नवीन ब्रिज ते खांडेकर वस्ती

तुंगत वळण रस्ता ते टोल नाका गोसावीवाडी

या कराव्यात उपाय योजना

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी अपघात का होतात याची वेळोवेळी पडताळणी केली पाहिजे-

अपघात प्रवण क्षेत्राचे फलक लावले पाहिजेत

जागोजागी रेडियम करणे गरजेचे आहे- गावाजवळील झेब्रा क्रॉसिंगवर पांढरे पट्टे ओढणे गरजेचे आहे-

गाव, शाळा असल्याचे फलक लावले पाहिजेत----

ग्रामीण भागातील जनतेला समजेल असे योग्य ते फलक जागोजागी लावले पाहिजे तसेच मार्गिका फलकही लावले पाहिजेत-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT