Bribe sakal
सोलापूर

Bribe: बक्षीसपत्र केलेल्या जमिनीच्या नोंदीसाठी लाच मंडलाधिकारी जाळ्यात

हुकूम मुलाणी

Mangalvedha: बक्षीसपत्र केलेल्या जमिनीचे सातबारावर नाव लावण्यासाठी सात हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना मारापुर मंडल अधिकारी चंद्रकांत इंगोले यांना लाच लुचपत पथकाने रंगेहात पकडले. कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली.

या प्रकरणाची हकीकत अशी की मारापुर मंडल मधील एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे बक्षीस पत्र करण्यात आले होते सदर बक्षीस पत्राची नोंद तलाठी यांच्या माध्यमातून दस्तावेज दिला.सदरची नोंद नोंद प्रमाणित करण्यासाठी सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती यामध्ये तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे ठरले.

सदरची रक्कम दामाजी कारखाना रोडवर स्वीकारत असताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस हवालदार सलीम मुल्ला,स्वामीराव जाधव, अतुल घाडगे यांच्या पथकाने केली या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली.

तालुक्यातील निम्म्याहून अधिक तलाठी व मंडल अधिकारी यांचा कारभार मंगळवेढ्यातून चालत असून ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना नोंदी व अन्य कामासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,तरीही महसूलच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याकडून होत असलेल्या पिळवणुकीकडे सोयीस्कर रित्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारदारांना लाच लुचपत पथकाचा आधार घ्यावा लागतो.

त्यामध्ये लाच लुचपत पथकाने देखील धडाकेबाज कामगिरी बजावली. यापूर्वी हुलजंती मंडलचे मंडल अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी देखील सापडलेले आहेत तरी देखील या गांभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करून पुन्हा मागचे पाढे पंचावन अशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास देण्याचे धोरण स्वीकारले.

दरम्यान मंगळवेढ्यातील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने व्हाट्सअपला चक्क स्टेटस ठेवून महसूल मधील तलाठी मंडळ अधिकारी नोंदीसाठी व अन्य कोणत्याही कामासाठी पैशाची मागणी करत असेल तर मला सांगा तुम्हाला न्याय मिळवून येतो असे टेटस ठेवण्यात आले. मात्र पैशाला चटवलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT