सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा ६ नोव्हेंबरपासून नियोजित आहे. त्याचे संभाव्य वेळापत्रकही विद्यापीठाने तयार केले आहे, पण विधानसभा निवडणुकीच्या तारखा पाहून ते अंतिम केले जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित १०८ उच्च महाविद्यालयांमधील ७० हजार विद्यार्थ्यांचे या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील सर्वच विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ही साधारणत: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच सुरू होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानेही कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरपासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. परंतु, विधानसभा निवडणूक व दिवाळी यामुळे परीक्षा नेमकी नियोजित वेळेत होईल की नाही हा विद्यार्थ्यांमधील संभ्रम अजूनही दूर झालेला नाही.
दरम्यान, परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी देखील विद्यापीठाचे प्रयत्न आहेत. बहुतेक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. ही परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होईल, असेही विद्यापीठाकडून सांगितले जात आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके देखील असणार आहेत. पेपर झाल्यावर लगेचच त्या-त्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्याची कार्यवाही सुरू केली जाणार असून पारंपारिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑफलाइन पद्धतीने तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑनस्क्रिन पद्धतीने तपासले जाणार आहेत.
वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याचे नियोजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा ६ नोव्हेंबरपासून नियोजित असून त्याचे संभाव्य वेळापत्रक करण्यात आले आहे. पण, विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर वेळापत्रकात बदल करायचा की आहे त्या वेळापत्रकानुसार परीक्षा घ्यायच्या, याचा निर्णय होईल.
- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
प्रथम वर्षाची परीक्षा त्याच महाविद्यालयात
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात होणार आहे. पण, त्यापुढील वर्गाची (द्वितीय, तृतीय किंवा अंतिम वर्ष) परीक्षा विविध महाविद्यालयांमध्ये घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्र परीक्षेपासून सरमिसळ पद्धत अवलंबण्याचेही विद्यापीठाचे नियोजित आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाची तयारी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.