Celebrations in South Kashi Barshi along with Ashadhi Wari of Pandharpur also canceled 
सोलापूर

'नको देवराया अंत आता पाहू' वारकऱ्यांची यंदा दुहेरी खंत 

संतोष कानगुडे

पानगाव (सोलापूर) : यंदा आषाढी एकादशीनिमित्त लाडक्‍या विठुरायाचे पंढरपुरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन करता येणार नसल्याने लाखो विठ्ठलभक्त वारकऱ्यांचे मन बेचैन आहे. कोरोनाने पालखी सोहळे व वारी रद्द झाली आहे. वारी करता आली नाही याची खंत भक्तांच्या मनात आहे. दुसरीकडे एकादशीनंतर द्वादशीला दक्षिण काशी बार्शीत होणारा उत्सवही यंदा रद्द करण्यात आला आहे. अनेक दशकांतून पहिल्यांदाच हा उत्सव पाहण्यात येणार नाही, हे देखील दु:ख भक्तांच्या मनात आहे. म्हणूनच या परिस्थितीवर "नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे', अशी विनवणी संत कान्होपात्रा यांच्या ओळीच्या माध्यमातून भक्त करत आहेत. त्यामुळे राज्यातूनच नव्हे तर देशातूनही कोरोना पूर्णपणे हद्दपार व्हावा, अशी भक्तांची यामागची भावना आहे. 
कशास काशी, गया, आयोध्या जावे रामेश्‍वरी, असता श्रीहरी आमुचे घरी अशी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या बार्शीच्या भगवंताची महती आहे. आषाढी एकादशीच्या कालावधीत भक्तांनी गजबजलेले मंदिर, दर्शनासाठी लागणाऱ्या मोठ्या रांगा, मैदानावरचा उत्सव, त्यासाठीची करण्यात येणारी तयारी, परिसरात सजलेली दुकाने, बार्शीत दाखल होणाऱ्या शेकडो लहान-मोठ्या दिंड्या, भक्तिभावात तल्लीन होऊन टाळ मृदंगाच्या तालावर डोलणारे वारकरी, बस स्थानकात वारकऱ्यांची होणारी गर्दी, यापैकी काहीही यावेळी कोरोना महामारीने दिसून येत नाही. त्यामुळे भक्तांची मने सुन्न होत आहेत. यामुळे संत कान्होपात्राच्या वरील ओळी वारकऱ्यांच्या तोंडातून आपोआप बाहेर पडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

Latest Maharashtra News Updates : महायुतीचं निर्विवाद वर्चस्व! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

Hemant Soren : झारखंडचा गड सोरेन यांनी राखला...इंडिया आघाडीला दोन तृतीयांश बहुमत; भाजपचा रथ रोखला

SCROLL FOR NEXT