Bhartiy Shetkari Kamgar Party Session sakal
सोलापूर

Jayant Patil : एक महिन्यात दिल्लीत घडणार मोठ्या राजकीय घडामोडी; जयंत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

एक महिन्यामध्ये केंद्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडणार आहेत. त्यासाठी शरद पवार हे दिल्लीत आहेत.

भारत नागणे

पंढरपूर - एक महिन्यामध्ये केंद्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडणार आहेत. त्यासाठी शरद पवार हे दिल्लीत आहेत. असा मोठा राजकीय गौफ्यस्फोट शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. श्री. पाटील यांच्या राजकीय वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पंढरपुरात दोन दिवसीय अधिवेशन सुरु आहे.

अधिवेशाच्या उदघाटनाला शुक्रवारी (ता. 2) शरद पवार येणार होते. परंतु अचानक दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याने शरद पवार दिल्लीला गेल्याचेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षाचे 19 वे राज्यस्तरीय अधिवेशनाला आज सुरवात झाली. अधिवेशनाचे उदघाटन दिपांकर भट्टाचार्य यांच्या हस्ते झाले.

स्वागतपर भाषणात बोलताना जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापने पासून ते आज पर्यंतचा इतिहास सांगितला. अलीकडेच झालेला विधान परिषद निवडणुकीतील पराभावर भाष्य करत काँग्रेसवर ही त्यांनी निशाणा साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाला अनेक वर्षाचा राजकीय इतिहास आहे.

पक्षाच्या नावावर अनेक नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठे झाले. पक्षाने त्यांना राजकीय ताकद दिली. राजकारणातील सत्ता पदापर्यंत पोचवले, पण पक्षावर किंवा पक्षातील एकाद्या नेत्यावर अडचणीची वेळ येते त्याचवेळी मात्र पक्षाचे नेते आणि पदाधिकारी साथ सोडून जातात. अलीकडच्या काळात असे प्रकार वाढल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने शरद पवार आणि महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या उदघाटनासाठी शरद पवार आज येणार होते. परंतु त्यांचा रात्री निरोप आला. दिल्लीत महत्वाच्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. एक महिन्यात मोठी राजकीय घडामोड घडणार आहे, त्यासाठी मला दिल्लाला थांबणे आवश्यक असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष युवा आघाडीचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाची भूमिका मांडली. अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळींना आपली भूमिका मांडली. उद्या दुपारी दोन वाजता अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

मनोज जरांगे जे बोलतात ते करतील असं वाटत नाही

मनोज जरांगे पाटील जे बोलतात ते करतील असे वाटत नाही. आरक्षण मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे. राजकारण करणे हा त्यांचा उद्देश नाही, असा टोला शेकापचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. एकाच आईची दोन मुल आहेत. पण एक मुलगा ओबीसी आणि दुसरा मुलगा मराठा कसा होऊ शकतो. ही सगळी भूमिका वेगळी आहे असे म्हणत त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला आहे.

जरांगे पाटील हे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत. धनगर समाजालाही आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे. केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी. शिवाय जातीय जनगणना करावी अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT