सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला मे आणि जून महिन्यासाठी मोफत प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि प्रती कुटुंब एक किलो हरभरा देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय पॅकेजअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि कोणत्याही योजनेत समाविष्ट नसलेल्या रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. उद्यापासून (गुरुवार, ता. 19) या धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूर शहरात 110 केंद्रांमार्फत सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना तर जिल्ह्यातील 943 केंद्रांतील एक लाख 4169 एवढ्या लाभार्थींना या योजनेचा लाभ होणार आहे. सोलापूर शहरातील अ, ब, क आणि ड परिमंडलातील रहिवासी भागात तर जिल्ह्यात प्रत्येक गावातील रेशन दुकानात आधारकार्ड दाखविल्यानंतर धान्य दिले जाणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला तांदूळ आणि हरभरा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठीचा तांदूळ आणि हरभरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
सोलापुरातील परिमंडल अ मधील रेशन दुकानदार
विनायक जाधव (उत्तर कसबा), वनमाला केंजळे (190, बुधवार पेठ), अरविंद बागदुरे (उत्तर कसबा), सिद्धाराम सुतार (467, शुक्रवार पेठ), नंदकुमार जगताप (124, बुधवार पेठ), मधुकर गायकवाड (तांडा, शिवाजीनगर), साईतीर्थ सहकारी गृहनिर्माण संस्था (191, बुधवार पेठ), सोलापूर सोशल असोसिएशन (915, शुक्रवार पेठ), इंडियन कंझ्युमर को-ऑप. सोसायटी (416, बेगम पेठ), कीर्ती मजूर सहकारी गृहनिर्माण संस्था (90, बुधवार पेठ), सुप्रभात सर्व व्यवसाय सहकारी गृहनिर्माण संस्था (बुधवार पेठ), बाळे सेवा सहकारी संस्था (वाणी गल्ली, बाळे), बाळे विकास कार्यकारी सोसायटी (अंबिकानगर, बाळे), जिजामाता महिला सहकारी गृहनिर्माण संस्था (गोल्डफिंच पेठ), राजदीप विविध वस्तू उत्पादक संस्था (41/146, न्यू बुधवार पेठ), सोलापूर सोशल असोसिएशन (248, बेगम पेठ), मराठा युवक मंडळ (4, बुधवार पेठ), अमर भीम क्रीडा मंडळ (41/115, न्यू बुधवार पेठ), आम्रपाली समाज सेवा मंडळ (केगाव), दयावान मागासवर्गीय सहकारी संस्था (197/6, बुधवार पेठ).
सोलापुरातील परिमंडल ब मधील रेशन दुकानदार
चंद्रकांत तांबे (मड्डी वस्ती, भवानी पेठ), नरेंद्र सर्व व्यवसायी सहकारी ग्राहक संस्था (रविवार पेठ), सूर्यकमल सर्व व्यवसायी कंझ्युमर्स सोसायटी (तुळशांतीनगर, जुने विडी घरकुल), मध्यमवर्गीय सर्व व्यवसायी ग्राहक संस्था (कन्ना चौक), मध्यमवर्गीय सर्व व्यवसायी ग्राहक संस्था (घोंगडे वस्ती, भवानी पेठ), मुकुंद सर्व व्यवसाय ग्राहक संस्था (जोडभावी पेठ), आदर्श ज्योती सहकारी ग्राहक संस्था (जोडभावी पेठ), मधू सर्व व्यवसाय ग्राहक संस्था (साखर पेठ), प्रियदर्शनी महिला बिडी कामगार (रविवार पेठ), शेळगी विविध कार्यकारी संस्था (शेळगी गावठाण), गोंधळी समाज सर्व व्यवसाय ग्राहक संस्था (गांधीनगर, रविवार पेठ), प्रभा महिला सर्व व्यवसाय ग्राहक संस्था (मड्डी वस्ती, भवानी पेठ).
सोलापुरातील परिमंडल क मधील रेशन दुकानदार
दत्त नगरच्या आजूबाजूचा परिसर (केंद्रप्रमुख-9372602002), अशोक चौक (9822899172), शास्त्रीनगर (8669077441), लोधी गल्ली/लष्कर/कामाठीपुरा (9503388802), नीलमनगर/एमआयडीसी (9422460928), मौलाली चौक/कुंभार गल्ली (9595828248), कल्याण नगर/ रेणुकानगर (9503544084), माधवनगर/आकाशवाणी केंद्र (8329392477), कर्णिकनगर पूर्ण (9975125670), सुनीलनगर आजूबाजूचा भाग (9225923342), हत्तुरेवस्ती आजूबाजूचा भाग (9881258495), नई जिंदगी आजूबाजूचा भाग (9665674950), स्वागतनगर आजूबाजूचा भाग (9325772349), संगमेश्वरनगर (9960132887), सैफुल आजूबाजूचा भाग (7588573999), तेलंगी पाच्छा पेठ आजूबाजूचा भाग (7350475664) आणि आसरा चौक आजूबाजूचा भाग (9325295135).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.