मंगळवेढा : धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळ्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भाकणुकीमध्ये एकमेकांचे फेटे फेकून दिल्यामुळे राजकारणात उलथापालची शक्यता असून खरीपात कमी तर रब्बी जास्त पाऊस तर पिक चांगले राहिल, रोगराईची शक्यता असून त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याची भाकणूक वर्तवण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष भाविकांच्या निर्बंधामुळे उत्साहाला मुरड घालावी लागली. हुलजंती येथील महालिंगराया बिरोबा सह सात पालख्याचा भेट सोहळा आज उत्साही वातावरणात उत्साहात रंगला. भंडारा, खोबरे व लोकरीची उधळण करत "महालिंगराया बिरोबाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने अभूतपूर्व सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातून आलेल्या भाविकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यंदा जनजीवन पूर्ववत असल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरली.सोमवारी रात्री मुंडास बांधण्याचा सोहळा पार पडल्यानंतर आज बुधवार दुपारी 4 च्या सुमारास महालिंगराया मंदिरालगतच्या ओढ्यात महालिंगराया -बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालखीचा भेटीचा सोहळा रंगला.
महालिंगरायाच्या पालखीस शिरढोणचा बिरोबा- शिलवंती, बिज्जरगीचा बाळाप्पा, जिरअंकलगीचा बिरोबा, सोन्याळचा पांडुरंग- विठ्ठल यांनी भेट दिल्यानंतर महालिंगराया- बिरोबा या गुरू- शिष्याची भेट झाली.नगारा व ढोल वाजवत प्रत्येक पालखी महालिंगराया पालखीस भेट देत असताना "महालिंगराया बिरोबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आल्याने परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला.
या भेटीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गोवा आदी राज्यांतून सुमारे सात ते आठ लाखांहून अधिक भाविक खासगी वाहनाने दाखल होऊन याची देही याची डोळा सोहळा अनुभवला. महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्यासह अन्य देवतांच्या भेटीच्या सोहळ्यानंतर मंदिर परिसरात भाकणूक झाली. या भाकणुकीकडे सोलापूर व उंब्रजच्या भाकणुकीप्रमाणे येथील भाकणुकीलाही विशेष महत्त्व व लक्ष लागून राहिलेले असते.
या भेटीच्या सोहळ्यास आ. समाधान अवताडे,राष्ट्रवादीचे भगीरथ भालके,माजी सभापती प्रदीप खांडेकर प्रा येताळा भगत तहसीलदार स्वप्निल रावडे, उद्योजक हनुमंत मासाळ, सुधाकर मासाळ, शिवाजी पटाप, सरपंच मीनाक्षी कुरमुर्ते, शिवानंद कुरमुत्ते, कामानंद हेगडे, शांताप्पा बिराजदार, विठ्ठल सरगर,संतोष चव्हाण यांनी भेट दिली.
मंगळवेढा आगाराच्या 11 बसेस तर बाहेरून 31 बसेस मागवून एकूण 42 एस.टी.बसेसचे नियोजन केले.तर कर्नाटक व महाराष्ट्रातील आठ लाखापेक्षा अधिक भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पो. नि. रणजित माने यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक व 13 पोलिस उपनिरीक्षक, 147 पोलिस कर्मचारी,1 दंगा काबु पथक,2 स्टॉकिंग फोर्स असा बंदोबस्त ठेवण्यात आला. भाविकांच्या गर्दीवर पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवून नियंत्रण ठेवले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.