बार्शी - शिवसेना फुटली पण माजी मंत्री दिलीप सोपल संयम ठेवून आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर नेतेमंडळीसह पदाधिकारीअद्यापही साहेबांच्या किं दादांच्या पाठीमागे जायचे यासाठी संभ्रमावस्थेत असतानाच छत्रपती संभाजीराजेंनी बार्शी तालुक्याचा ऐन निवडणूकीपूर्वी दौरा आखून तालुक्यात शाखांचा शुभारंभ केल्याने मतदारांमध्ये जागृती निर्माण झाली असून, बार्शी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
बार्शी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, अशी आजपर्यंत तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली आहे. पण लढत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पहायला मिळाली आहे. प्रसंगी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर माजी मंत्री सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी अपक्ष उभारुन विजय संपादन केला आहे. त्यातच आता तालुक्यात छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची मुहूर्तमेढ रोवली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र निर्माण करण्याची घोषणा केली आहे.
संभाजीराजेंच्या बार्शीच्या पहिल्याच सभेला झालेली गर्दी आणि त्यांनी छत्रपतींच्या भाषेत केलेल्या गर्जनेला बार्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि मागील चार दिवसांपासून एकच विषय चर्चेत आहे. तो म्हणजे आता दुरंगी तर सोडाच पंचरंगी लढती होतील अन् कोणाचा फायदा, कोणाचा तोटा यावर मंथन सुरु झाले आहे.
छ्त्रपती संभाजीराजे बार्शीच्या सभेत बोलताना म्हणाले, आजपर्यंत शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले पण शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा सुसंस्कृत महाराष्ट्र राहिला आहे का? गद्दारी, फसवणूक, नैसर्गिक युती बाजूला, पुरोगामी सत्तेत गेले, विरोधी पक्ष राहिला नाही ही लोकशाहीची थट्टा आहे सुसंस्कृत महाराष्ट्र स्वराज्यच्या माध्यमातून घडवणार आहे.
वंचित, गरीब, शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांचेवर अन्याय होत आहे. न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना स्थापन झाली आहे. समाजासाठी जबाबदारी आम्ही स्विकारली आहे. पंचाहत्तर वर्षे होऊन गेले त्याच समस्या, पाणी नाही, रस्त्यांची अवस्था, टेंडर, ठेकेदार ठरलेले, बार्शीत काय चालते दहशत इतकी? जगात जर्मनी अन् देशात परभणी अशी ओळख मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या भगवंताच्या बार्शीची करायची आहे का?
दहशत शब्द मला खूप टोचलाय, वाळूची तस्करी रोखणाऱ्याचे हात - पाय तोडले, आशिर्वाद देणारे कसे चालतात तुम्हाला, छत्रपतींची काय ताकद आहे ते दाखवतो २०२४ ला प्रामाणिक उमेदवार द्या, येथे मुक्काम करतो सुसंस्कृत बार्शी, सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण करण्याची संधी आली आहे, वेळ जागे होण्याची आहे.
राज्याचे तीन वर्षाचे राजकारण मला समजलेच नाही नैसर्गिक युती बाजूला, दुसराच मुख्यमंत्री, शिवसेना, राष्ट्रवादी, पक्षांशी संबध नाही, म्हणे विकासासाठी एकत्र आलो, ९ मंत्री आरडाओरड पुरोगामी सर्वजण सत्तेत गेले विरोधी पक्ष राहिलाच नाही निवडणूकीपूर्वीच का ठरवले नाही. महाराष्ट्राला महापुरुष, संतांच्या भूमीचा आदर्श आहे इतर राज्यांनी, देशांनी हा आदर्श घ्यायचा का असा टोला संभाजीराजे यांनी लगावला .
भाजपसोबत सुरुवातीपासून सहयोगी असलेले तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत, शिवसेनेमध्ये आजही असलेले माजी मंत्री दिलीप सोपल, मुख्यमंत्री शिंदे गटाचा उमेदवार म्हणून भाऊसाहेब आंधळकर यांनीही दंड थोपटले आहेत.
तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले विश्वास बारबोले तर तेलगंणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाच्या वाटेवर असलेले अनेक कार्यकर्ते असे चित्र तालुक्याचे असून आगामी निवडणुकांमध्ये मतदारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
तालुक्यात माजी मंत्री दिलीप सोपल व विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील तीस वर्षांत स्वतःचे गट शाबूत ठेऊन विकासासाठी पक्षीय राजकारण करुन तालुक्याचा विकासासाठी प्रयत्न केला आहे. तरी तालुक्यात छत्रपती संभाजीराजेंनी मी बार्शीत तळ ठोकून राहतो असा दिलेला विश्वास व पक्षाची बांधणी करण्यासाठी केलेली तयारीची मतदारांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.