सोलापूर

छत्रपतींचा जयजयकार घुमला आसमंतात 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातील विविध मंडळांनी मिरवणुका काढल्या. त्यामध्ये "छत्रपती शिवाजी महाराज की...जय', "जय भवानी...जय शिवाजी'च्या घोषणांनी छत्रपतींचा जयजयकार आसमंतात घुमला. या मिरवणुकीत विविध मंडळांनी सादर केलेल्या "लेझर शो'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच विविध मंडळांनी मिरवणुकीची तयारी केली होती. आज सकाळी विविध मध्यवर्ती मंडळांच्यावतीने महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अनेक मंडळांनी आपल्या मिरवणुका पार्क चौकातून काढल्या. मिरवणुकीमध्ये आबालवृद्धांचा मोठा सहभाग होता. अनेक सोलापूरकर कुटुंबांसह मिरवणुका पाहण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडल्याचे दृश्‍य पाहायला मिळत होते. या मिरवणुकीमध्ये अनेक बालशिवबा पाहायला मिळाले. मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. अनेक मंडळांनी विविध प्रकारचे देखावे सादर केले होते. पत्रा तालमीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा देखावा सादर केला होता. जागृती मंडळाच्यावतीने कोंडाणा किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती. त्याचबरोबर सरकता मंडपही त्यांनी तयार केला होता. त्या मंडपामध्ये मंडळाचे कार्यकर्ते लेझीम खेळत होते. त्या मंडळाने तयार केलेला सरकता मंडप उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. भगवा आखाड्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची अश्‍वारूढ मूर्ती तयार केली होती. ए. आर. ग्रुपच्यावतीने राजदरबार देखावा सादर केला होता. रोडगे बंधूंच्या आजाद हिंद युवक मंडळाने रांजे गावच्या पाटलाला चुकीबद्दल शिवरायांनी दिलेल्या शिक्षेचा देखावा सादर केला. जगदंब जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने पारंपरिक वेशभूषेतील मुला-मुलींनी ढोल पथकाचा खेळ सादर केला. 

ढोल-ताशाच्या जोरावर थिरकली तरुणाई 
पिपाणी वाद्य व लेझीमचा खेळ सादर करीत मिरवणुकीत रंग भरला. ढोल-ताशा व डीजेच्या तालावर तरुणाईची पावले थिरकली. अनेक मंडळांनी गड-किल्ल्यांचे देखावे सादर करीत त्याद्वारे शिवरायांच्या पराक्रमाचे अनेक पैलू उलगडून दाखविले. 

विविध मंडळांचा सहभाग 
मिरवणुकीत शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या महिला ढोल पथकानेही लक्ष वेधून घेतले. जय हिंद तालीम संघ, श्रीमंतराजे प्रतिष्ठान, माता प्रतिष्ठान, शिवराम प्रतिष्ठान, भोईराज प्रतिष्ठान, शिवनेरी प्रतिष्ठान, पूर्व विभाग शिवजन्मोत्सव मंडळ, शिवप्रकाश प्रतिष्ठान, भगवा आखाडा, दहशत ग्रुपसह विविध मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. 

शिंदे चौकात उद्‌घाटन 
शिंदे चौकाजवळ आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, सुनील रसाळे, नगरसेवक विनोद भोसले, विजय पुकाळे, राजन जाधव, माऊली पवार, अंबादास गुत्तीकोंडा, नाना भोसले, वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, शहराध्यक्ष ज्योतिराम चांगभले, भाऊसाहेब रोडगे, श्रीकांत घाडगे, प्रताप चव्हाण, गणेश डोंगरे, उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल खेकडे उपस्थित होते. 

मिरवणुकीवर केली पुष्पवृष्टी 
मराठा समाज सेवा मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी प्रशालेसमोर उभारण्यात आलेल्या शिवतीर्थावरून मिरवणुकीतील शिवजन्मोत्सव मंडळांवर मंडळाचे अध्यक्ष मनोज सपाटे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येत होती. यावेळी प्रा. महेश माने, हनुमंत बोडके, नामदेव थोरात, प्राचार्य अनिल बारबोले, दत्ता भोसले उपस्थित होते. पुष्पवृष्टीसाठी एक हजार 100 किलो फुले आणली होती. शिवरायांबरोबर राजमाता जिजाऊ साहेबांची मूर्तीही विराजमान केली होती. 

पदाधिकाऱ्यांचा सन्मान व भोजनही 
मेकॅनिक चौकात गणेश डोंगरे मित्रपरिवाराच्या वतीने सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नगरसेवक अमोल शिंदे यांनी निवडणुकीत सहभागी झालेल्या शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. 

माजी मंत्र्यांचा मिरवणुकीत सहभाग 
माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दोन्ही मंत्र्यांनी या मिरवणुकीत वेगवेगळ्या मंडळांच्या देखाव्यांची, लेझीम, ढोल पथकाची पाहणी केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT