"जबाबदारीने काम करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करूया!' Canva
सोलापूर

"जबाबदारीने काम करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करूया!'

"जबाबदारीने काम करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करूया!'

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुमारे साडेसहा तास गाडी चालवत मुंबईहून पंढरपुरात आले.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी एकादशीची (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे सुमारे साडेसहा तास गाडी चालवत मुंबईहून पंढरपुरात आले. सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास त्यांचे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोरोनाविषयक (Covid-19) आढावा घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामांचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे. यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. (Chief Minister Uddhav Thackeray said that by acting responsibly, let's fight the possible third wave of corona-ssd73)

या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharne), माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar), सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर (Solapur Municipal Commissioner P. Shivshankar), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy,), कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया (Special Inspector General of Police of Kolhapur Manoj Lohia), जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (District Superintendent of Police Tejaswi Satpute), अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव (Upper Collector Sanjeev Jadhav), निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे (Resident Deputy Collector Bharat Waghmare), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले (District Surgeon Dr. Pradeep Dhele), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव (District Health Officer Dr. Sheetalkumar Jadhav) आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, ऑक्‍सिजन, लसीकरण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.

या वेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळित होईल. ऑक्‍सिजनची (Oxygen) उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा. ऑक्‍सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खासगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा. कोविड झालेल्या रुग्णांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करा.

म्युकरमायकोसिसबाबत (Mucormycosis) सतर्कता बाळगण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी, औषधांचा पुरेसा साठा, इंजेक्‍शनची कमतरता पडणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना केल्या. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी लहान मुलांना धोका असल्याची शक्‍यता वर्तवली आहे. याबाबत त्यांच्या उपचारासाठी आवश्‍यक हॉस्पिटलची निर्मिती, त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सोलापूरच्या पाण्याचा विषय मार्गी लावणार

पालकमंत्री श्री. भरणे यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी दुहेरी पाइपलाइनसाठी अजून 103 कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पाण्याचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

पोलिस आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी पंढरपूरमध्ये ऑक्‍सिजन आणि आयसीयू 60 बेडचे रुग्णालय सुरू केल्याची माहिती श्रीमती सातपुते यांनी दिली. पोलिस विभागासाठी आवश्‍यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मागणी केली. पोलिस विभागाच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देऊ, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

महिनाभरात कोरोना रुग्ण नसणाऱ्या गावात सहावी ते बारावीचे वर्ग सुरू केल्याची माहिती श्री. स्वामी यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी झाडाखाली, पारावर शाळा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT