CM Eknath Shinde Praise PM Modi solapur Visit abu dhabi ram mandir pran pratishtha ayodhya  
सोलापूर

PM Modi In Solapur : अबुधाबीमध्येही राम मंदिराचं उद्घाटन मोदीच करणार..! CM शिंदेंनी सांगितला दावोसमधला किस्सा

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथे बांधण्यात आलेल्या ९० हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले. कोट्यवधींच्या प्रकल्पाची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केलं.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गाचं भूमीपूजन, लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं. मुंबईतील अटल सेतू, एमटीएचएलचं भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मोदींनी केलं, अशा अनेक योजना आहेत. यामुळे मोदींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर ती वास्तवात देखील येते. मोदींच्या हाताला यश आहे. असं सत्कर्म आणि भाग्य खूप कमी लोकांच्या नशिबात असतं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही स्वतःला देखील भाग्यशाली समजतो कारण आम्हाला अशा नेतृत्वाचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळत आहे . मला सांगताना गर्व होतोय की, मी कालच दावोसहून परतलो आहे. महाराष्ट्र सरकारने तेथे तीन लाख ५३ हजार कोटीच्या करारांवर स्वाक्षरी केल्या. दीड लाखांहून अधिक करारांना स्वीकृती देखील मिळाली . मला तेथे अनेक देशांचे प्रमुख, उद्योजक भेटले. त्या सर्वांच्या तोंडी मोदींचे नाव होते, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

सर्व उद्योजकांना विश्वास आहे की, मोदी सरकारची पुन्हा देशात सत्ता स्थापन होईल. मोदींच्या सोबत राज्यात देखील डबल इंजिन सरकार बनेल. मागीच्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होत आहे. पण गुंतवणूक होण्यामागे देखील मोदींचे आशीर्वाद होते असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

आजपासून साडेतीन वर्षांपूर्वी अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचे भूमिपूजन देखील मोदींनी केलं होतं. आता तिथे भव्य मंदिर बांधले जात आहे आणि तीन दिवसानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. कोट्यवधी राम भक्तांचे स्वप्न मोदीजी पूर्ण करत आहेत. याची देखील जगभरात उत्सुकता आहे. दावोसमध्ये मला अबुधाबीचे लोक भेटले. त्यांनी सांगितलं की राम मंदिर अयोध्येत बांधले जात आहे, अबुधाबीत देखील राम मंदिर बांधलं जात आहे आणि त्यांच उद्घाटन देशाच्या बाहेर देखील मोदी करणार आहेत . आज अशाच मंदिराप्रमाणे घरांच्या चाव्या सोपवल्या जात आहेत. ही मोठं उदाहरण आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान बोट उलटली; १० ते १२ जण पाण्यात पडले, पाहा थरारक व्हिडिओ

Latur Crime : गर्भपात करताना बोगस डॉक्टराला रंगेहात पकडले; वैद्यकीय अधिकारी व पोलिस पथकाची कामगिरी

'टीम इंडियात आलो तेव्हा हरभजनची जागा भरण्याची जबाबदारी...', R Ashwin मोकळेपणाने झाला व्यक्त

Latest Maharashtra News Live Updates: भारतीय महिला संघाने बुडापेस्ट येथे अझरबैजानला हरवून पहिले बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेतेपद पटकावले

SCROLL FOR NEXT