यंदाच्या हंगामापासून साखर कारखान्यांना डिजिटल काटे बसविण्याची सक्ती करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी आणि कारखानदार यांच्यामधील अविश्वासाच्या संबंधाला आळा बसेल. सध्याही ऊस उत्पादकांना शंका आल्यास इतर काट्यावर वजन करून कारखान्याच्या काट्यांची पडताळणी करता येते.
शंका आल्यास आपल्याला हेल्पलाइनशी संपर्क साधल्यास त्वरित तपासणी केली जाते, अशी माहिती वैधमापनशास्त्र विभागाचे अलकेश गेटमे यांनी दिली. ‘कॉफी विथ सकाळ’च्या उपक्रमात ते बोलत होते.
sugar mills to install digital forks season alkesh getme
काही ठळक बाबी...
मिठाई देताना बॉक्सचे वजन वजा करणे आवश्यक
सोने खरेदी- विक्रीसाठी क्लास वनचे काटे वापरणे गरजेचे
दुधाची विक्री लिटरमध्ये तुपाची विक्री किलोवर होणे आवश्यक
ग्राहकाने मागणी केल्यास सिलिंडरचे वजन करून देण्याचे गॅस कंपनीला बंधन
प्रत्येक खरेदीचे ग्राहकांनी घ्यावे बिल; बिलाशिवाय ग्राहक मंचात मागता येत नाही दाद
वजन मापे खात्याबद्दल थोडेसे...
वैधमापनशास्त्र विभागाचे धोरण केंद्र सरकार ठरवते तर अंमलबजावणी राज्य सरकार करते. वजन काट्यांचे प्रमाणीकरण करणे, तक्रार निवारण करणे, अचानक काटे तपासणी करणे आदी कामे या विभागाकडून केली जातात.
तक्रारीनुसार साखर कारखान्याच्या काट्यांची तपासणी करताना संबंधित तालुक्याचे तहसीलदार, पोलिस अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थित तपासणी केली जाते. यापुढे साखर कारखान्याला शासनाकडून काटे बसवावे, अशा सूचना देण्यात आल्या असून डिजिटल काट्यांची सक्ती करण्यात आली आहे.
पेट्रोलची करता येते पडताळणी
ग्राहकांना मापात सर्वाधिक संशय हा पेट्रोलच्याबाबतीत येतो. पेट्रोल पंपाच्या सेटींगमध्ये फेरबदल करण्यासाठी पेट्रोल कंपनीकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. ओटीपी आल्याशिवाय यात बदल करता येत नाहीत.
तसेच केलेल्या फेरबदलची संपूर्ण माहिती मशिनमध्ये सेव्ह होते. याशिवाय ग्राहकांना मापात दोष असल्याची शंका आल्यास पंपावरच पडताळणी करण्याचे अधिकार आहेत. याकरिता प्रत्येक पंपावर पाच लिटरचे मापदेखील उपलब्ध असते. या मापाने पडताळणी करता येते.
एक वर्षातील कारवाई
वजन माप खात्याने मागील एक वर्षात ७१ खटले दाखल केले असून पाच लाख ५४ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. याशिवाय काटे पडताळणी व प्रमाणीकरणातून सोलापूर जिल्ह्याला तीन कोटी ३२ लाख ४० हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. सध्या कार्यालयाला मनुष्य बळ व प्रशस्त इमारतीची आवश्यकता आहे.
इलेक्ट्रिक काट्यांची दरवर्षी तपासणी
बाजारातील इलेक्ट्रीक काटे दरवर्षी तपासणी करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांनी प्रतिवर्षी ऑनलाइन अर्ज करून आपले काटे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. जर काटे मॅकेनिकल पद्धतीचे दोन वर्षातून एकदा प्रमाणिकीकरण करणे आवश्यक आहे.
बाजार समित्यांमधील वजन काटा तपासण्याचे अधिकार वैधमापन विभागालाच आहेत. व्यापरी शेतकऱ्यांकडून जादा वजन घेत असतील, तर तक्रार करता येते. वजन मापे विभागही वरचेवर तपासणी करतो. मात्र, कडता, तूट, कचरा, हवा यासाठी अधिकृतपणे किती वजन कमी करायचे हे बाजार समिती ठरविते.
इ-कॉमर्स क्षेत्रात नियम
इ-कॉमर्स क्षेत्रातही ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून वजन माप खात्याला अधिकार दिले आहेत. उत्पादित मालाची सर्व माहिती विशेषतः वस्तूचे नाव, उत्पादन तिथी (महिना, वर्ष) वजन आदी सर्व माहिती मुद्रित होणे आवश्यक आहे. प्रत्येक उत्पादनावर माहिती लिहिणे आवश्यक आहे. त्याबरोबरच ग्राहकांना बिल देणेही बंधनकारक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.