Dattatray Gavsane Sakal
सोलापूर

Coffee with Sakal : कृषी योजनासुध्दा शेतकऱ्याला बनवू शकतात कोट्यधीश; कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने

कृषी विभाग हा प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा व प्रमुख विभाग असून कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमांतून एका शेतकऱ्याला विविध योजनांमधून एक कोटी रुपयांचा लाभ मिळू शकतो.

सकाळ वृत्तसेवा

Agriculture Department : कृषी विभाग हा प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा व प्रमुख विभाग असून कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमांतून एका शेतकऱ्याला विविध योजनांमधून एक कोटी रुपयांचा लाभ मिळू शकतो. कृषी योजनासुध्दा शेतकऱ्याला कोट्यधीश बनवू शकतात. एक एकराच्या पॉली हाऊससाठी १८ लाख रुपयांचे अनुदान आहे.

याशिवाय विविध अवजारे, फळबाग लागवड, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ठिबक सिंचन संच, शेततळे, कांदा चाळ, गांडुळ खत प्रकल्प यासह अनेकविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी लाभ घेऊ शकतात. सर्व निवड प्रक्रिया ऑनलाइनच असल्याने शेतकरी घरातून अर्ज करू शकतात.

गावसाने यांचा प्रवास

दत्तात्रय गावसाने हे एक जुलैपासून सोलापूर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यातील गावडी दारफळचे असलेले गावसाने यांनी आजपर्यंत कृषी विभागात राज्यातील विविध ठिकाणी काम पाहिले आहे. यापूर्वी ठाणे, परतूर (जि. जालाना) किनवट (जि. नांदेड) जत (जि. सांगली) भूम, सोलापूर येथे ‘आत्मा’चे संचालक, वाशीम, लातूर येथे काम केले आहे.

ऑनलाइनमुळे आली सुसूत्रता

कृषी विभागाचा सर्व कारभार ऑनलाइन झाला असून कोणालाही त्यात हस्तक्षेप करता येत नाही. एकदा अर्ज भरल्यानंतर क्रम बदलता येत नाही. लाभार्थ्याला स्वत:ला आपल्या अर्जाचे स्टेटस पाहता येते. ऑनलाइनच अर्ज करावा, ऑनलाइनच कागदपत्रे सादर करवी, अनुदानही ऑनलाइनच मंजुरी मिळते. यामुळे प्रशासकीय पातळीवर सुसूत्रता आली आहे. मानवी हस्तक्षेप टाळल्याने बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. एकूण कामात पारदर्शकता आली आहे.

शेतीला जोडधंदा पूरक

निव्वळ शेती करणे कधीही फायदेशीर ठरणार नाही. पशुपालन दुग्धव्यवसाय, शेळीपालन, वाहन व्यवसाय किंवा इतर कोणताही जोडधंदा असेल तरच शेती करता येते. विदर्भातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रात अभ्यासदौरे केल्यानंतर याबाबी समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अनेक शेतीपूरक उद्योग करतात.

असे उद्योगच शेतीला व शेतकऱ्यांना तारू शकतात. एकात्मिक शेती करत फळबाग, भाजीपाला, ऊसशेती व त्याला दुग्धव्यवसाय, कुकुटपालन उद्योगाची जोड देणे आवश्यक आहे.

सेंद्रिय उत्पादनाला हवी बाजारपेठ

सेंद्रिय शेती ही उत्पादन खर्च कमी करणारी शेती आहे. ही शेती नेहमीच फायद्याची आहे. फक्त उत्पादित मालासाठी आपण स्वत:च ग्राहक शोधणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीचे मार्केट हे विश्वासाहर्तेवर अवलंबून असल्याने ते स्वतः: शेतकऱ्यांनीच शोधून तयार करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरण प्रक्रिया उपलब्ध आहे. गटशेतीमधून तयार झालेल्या सेंद्रिय शेतीला योग्य बाजारपेठ शोधल्यास नक्कीच फायदा होइल.

नवतंत्रज्ञानाचा स्वीकार

शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. तरच ऊस शेतीपासून सर्व पिकांची उत्पादकता वाढणार आहे. मशिनरीकरणाचा वापर आवश्यक आहे. नवतंत्रज्ञान अवगत केल्यास देशातील कोणतेही प्रगत शेतीतील प्रयोग आपल्या शेतीत राबविता येतात. यासाठी यांत्रिकीकरणासह माहिती तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अपेक्षित आहे.

पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी अनेक नवी तंत्रे उपलब्ध आहेत. याची माहिती शेतकऱ्यांनी घेऊन ती वापरात आणली पाहिजे.

ठळक बाबी…

  • बदलता पाऊस हवामानाचा अभ्यास करून निवडावी पिके

  • पिकांची लागवड करताना बाजार भावावर लक्ष देणे आवश्यक

  • अनेक शेतकरी प्रेरणादायी आहेत; त्यांच्यापासून इतरांनी घ्यावी प्रेरणा

  • शेतीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक करावा

  • शेतकऱ्यांनी स्वतः कोणत्या कोणत्या पिकाचे तज्ज्ञ व्हावे

केंद्राची योजना फायद्याची

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी विविध सवलती जाहीर केल्या असून त्या शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहेत. यामध्ये बेदाना, दालमिल, तेलघाणे अशा विविध योजना आहेत. यापैकी आपल्या जिल्ह्यात बेदाणा उद्योगाला चांगला प्रतिसाद आहे.

सध्या तिरुपती बालाजीच्या प्रसाद म्हणून विक्री करण्यात येणाऱ्या लाडूमध्ये सोलापूरच्या बेदाण्याचा वापर केला जातो. अन्नप्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT