compensation for crop insurance claims of 32700 farmers in Maharashtra is lying in banks adhar card technical error Sakal
सोलापूर

Solapur News : पीकविम्याचे अडकले साडेदहा कोटी; ३२ हजार ७०० शेतकऱ्यांची भरपाई बॅंकेत पडून

पावसाचा मोठा खंड पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार भरपाईपोटी विमा कंपनीकडून दोन लाख १० हजार शेतकऱ्यांना खरीप पीकविम्याचा २५ टक्के अग्रिम मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : पावसाचा मोठा खंड पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार भरपाईपोटी विमा कंपनीकडून दोन लाख १० हजार शेतकऱ्यांना खरीप पीकविम्याचा २५ टक्के अग्रिम मिळाला.

मात्र, बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नाही किंवा बॅंक खात्यासंबंधीत तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७६० शेतकऱ्यांचे साडेदहा कोटी रुपये बॅंकांमध्येच पडून आहेत. ऐन पावसाळ्यातच पावसाचा सलग २१ दिवसांपेक्षा अधिक खंड पडला आणि खरीप पिकांनी माना टाकल्या.

संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविम्याचा २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना काढली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यातून आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७० हजार शेतकऱ्यांना १०३ कोटी रुपयांचा पीकविम्याचा अग्रिम मिळाला. सोयाबीन, बाजरी, मका या पिकांसाठी तो अग्रिम आहे.

विमा कंपनीकडून वितरित झालेले अग्रिमचे दहा कोटी ६६ लाख रुपये अजूनही बॅंकांमध्येच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून आहेत. त्या शेतकऱ्यांना आता ज्या राष्ट्रीयीकृत बॅंकेत त्यांचे खाते आहे, त्याठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण किंवा खात्यासंबंधीची अडचण दूर करावी लागणार आहे. त्याशिवाय त्यांना ही रक्कम मिळणार नाही, असे कृषीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीक कापणी झाली, अहवालही गेला, भरपाई कधी?

खरीप हंगामातील नुकसानीपोटी विमा कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम (ॲडव्हान्स भरपाई) देण्यात आला. पण, पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्षातील उंबरठा उत्पन्न, यातील तफावत शेतकऱ्यांना भरपाई म्हणून देणे अपेक्षित आहे.

पीक कापणी प्रयोगाचा अहवाल कृषी आयुक्तालयाला सादर झाला व तेथून विमा कंपनीलाही पाठविल्याचे सांगितले जात आहे. परंतु, अद्याप ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना उर्वरित भरपाई मिळालेली नाही. जिल्ह्यातील किती शेतकरी पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार नुकसान भरपाईस पात्र आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अग्रिम अडकलेले पीकनिहाय शेतकरी

पीक - शेतकरी

  • सोयाबीन- १२,७००

  • बाजरी- ६,८५०

  • मका -१३,२१०

  • एकूण -३२,७६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT