Vaccination Esakal
सोलापूर

दुसरा डोस कधी घ्यायचा? दोन डोसमधील अंतर वाढत असल्याने संभ्रम

कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर सातत्याने वाढत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधक लसीच्या (Corona preventive vaccine) दोन डोसमधील अंतरात सातत्याने बदल करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. कोव्हिड पोर्टल (Covid Portal) वर दुसऱ्या डोससाठी नोंदणी करताना आता 12 ते 16 आठवड्यांचा कालावधी आवश्‍यक असल्याचे दाखवत असल्याने त्यापेक्षा कमी कालावधी झालेल्यांची नोंदणीच होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये दुसऱ्या डोससंदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या डोसबाबतीत केंद्राचे ठोस धोरण नसल्याने लसीकरणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. (Confusion as the distance between the two doses is constantly increasing)

लसीकरणाच्या प्रारंभीच्या काळात दुसऱ्या डोससाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 4 ते 6 आठवड्यांत घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामध्ये पुन्हा वाढ करून नंतर तो 4 ते 8 आठवड्यांचा करण्यात आला. एप्रिल महिन्यात केंद्राने परत त्यामध्ये बदल करून दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांत घेतल्यास त्याची परिणामकारकता अधिक असल्याचे स्पष्ट केले. मागील तीन-चार दिवसांत कोविशिल्डचा दुसरा डोस 4 ते 6 आठवड्यांऐवजी थेट 12 ते 16 आठवड्यांत घ्यावा, अशी शिफारस नॅशनल टेक्‍निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) केंद्राला शिफारस केली आहे. ही शिफारस करताना एनटीएजीआयने ब्रिटन, स्पेनसारख्या प्रगत देशांचे उदाहरण दिले आहे. ही शिफारस केंद्राने स्वीकारली असून त्यानुसार कोविन ऍपमध्ये बदल केले आहेत. सहा आठवड्यांनी दुसरा डोस घेतल्यास त्याची परिणामकारकता 55.1 टक्के तर 12 आठवड्यांनी घेतल्यास ती 81.3 टक्के असल्याचा दावा एनटीएजीआयने केला आहे.

ब्रिटनमध्ये दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांचे करण्यात आले होते. मात्र, भारतात कोरोना विषाणूचा सामान्य असलेल्यांपेक्षा वेगळा प्रकार आढळल्याचा दावा ब्रिटनने केला होता. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दोन डोसमधील अंतराचा कालावधी पुन्हा कमी करून 8 आठवड्यांचा करीत असल्याचे दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. भारतात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याचा ब्रिटनचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खोडून काढला असला, तरी दोन डोसमधील अंतर भारतात पुन्हा कमी होणार का, हा खरा प्रश्न आहे.

लसीचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांत घेतला नाही तर त्याची परिणामकारकता दिसणार नाही, असे केंद्राने आधी सांगितले होते. कोरोनाने देशात थैमान घातल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांचा कल वाढला. अशातच देशात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याची मागणी होऊ लागली. पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करू लागले. त्यासाठी अनेकजण आदल्या दिवशीच रात्री लसीकरण केंद्रावर मुक्कामी जाऊ लागले. दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याची सूचना राज्य सरकारनेही केली. त्यासाठी पहिला डोस देण्याचे थांबविण्यात आले.

सरकार राष्ट्रीय स्तरावर धोरण जाहीर करते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवावी लागते. पोर्टलमध्ये तसे बदल केले आहेत. त्यामुळे कोविशिल्डचा दुसरा डोस 12 आठवड्यांच्या आत मिळू शकत नाही.

- डॉ. रामचंद्र मोहिते, तालुका वैद्यकीय अधिकारी, माळशिरस

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आता लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर 84 दिवसांनंतर घेता येतो. यामध्ये ज्या लाभार्थींनी नोंदणी केलेली असेल, त्यांनाही हा डोस लगेच घेता येणार नाही. 84 दिवसांनंतर त्यांना नोंदणीप्रमाणे लसीकरण करण्यात येईल व दुसरा डोस मिळेल.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, समन्वयक, जिल्हा लसीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT