कोठे, तौफिक शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे माजी महापौरही अस्वस्थ esakal
सोलापूर

कोठे, शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे बेरियाही...

कोठे, तौफिक शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे माजी महापौरही अस्वस्थ

तात्या लांडगे

शहरातील शिवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीतील दिग्गज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत.

सोलापूर : शहरातील शिवसेना (Shiv Sena), एमआयएम (MIM), वंचित बहुजन आघाडीतील (Wanchit Bahujan Aghadi) दिग्गज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) वाटेवर आहेत. कॉंग्रेसचे (Cngress) माजी महापौर नलिनी चंदेले (Nalini Chandele), माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल (Sudhir Kharatmal) यांनी 8 ऑक्‍टोबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी कॉंग्रेसचे माजी महापौर ऍड. यू. एन. बेरियांनीही (U. N. Beria) महेश कोठेंच्या (Mahesh Kothe) निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढली. तरीही, तीन दिवसांपूर्वी ते राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीला आवर्जून हजर राहिले. त्यामुळे 'ऍड. बेरियाजी, हा योगायोग की खरटमल, चंदेलेंप्रमाणे तुम्ही पण कॉंग्रेस सोडली', असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर महापालिकेवर मोदी लाटेत भाजपने सत्ता काबीज केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीचा भाव वधारला आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण खाली ठेवत महेश कोठेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या माध्यमातून आनंद चंदनशिवे, तौफिक शेख हेदेखील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेमात पडले. पक्षात मानपान मिळत नाही, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा खासदारकीला दोनदा पराभव झाल्यानंतर तेही राजकारणातून अलिप्त आहेत. दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे याही आठवड्यातील काही दिवस सोलापूर दौऱ्यावर येतात आणि लगेचच मुंबईला जातात. पक्षाचे संघटन विस्कटल्याने महापालिका निवडणुकीत सत्ता मिळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, निवडणुकीपूर्वी कोठेंसोबत त्यांचे समर्थक नगरसेवकही राष्ट्रवादीत येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा पक्ष राहील, याची खात्री वाटू लागल्याने बेरियांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

ऍड. बेरियांची एकच मागणी...

ऍड. यू. एन. बेरिया हे खूप वर्षांपासून अस्वस्थ असतानाही त्यांनी "पक्ष सोडणार नाही, अजून कोणताही निर्णय घेतला नाही', असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, आता निर्णय घेण्याची हीच योग्य असल्याचे पटवून देण्यात महेश कोठेंसह राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतेमंडळी यशस्वी ठरली आहेत. त्यामुळेच त्या नेत्यांशी बेरियांची जवळीकता वाढली आहे. तत्पूर्वी, मागील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी बंडाचे निशाण फडकावत आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभेची उमेवारी देऊन शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, ती मागणी पूर्ण न झाल्याने बेरिया अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

आचारसंहितेपूर्वी सर्वांचेच पक्षांतर

एखाद्या पक्षाच्या चिन्हावरील पदाचा लाभ घेत असताना कायदेशीररीत्या पक्षांतर करता येत नाही. तरीही, पक्षांतर केल्यास पक्षांतर बंदी कायद्याअंर्गत कारवाई होऊ शकते. या तांत्रिक अडचणींमुळे इच्छुकांचे प्रवेश रखडले आहेत. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीतील दिग्गजांच्या उपस्थितीत सर्वांच्या पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT