सोलापूर : नातेसंबंध विसरायला भाग पाडून या जगात खरचं कोण कोणाचा आहे, याची प्रचिती त्याने सर्वांनाच करून दिली. अनेक चिमुकल्यांना वडिल समजण्यापूर्वीच कोरोनाने त्या वडीलाचा बळी घेतला. स्मशानभूमीदेखील गहिवरली, अशी स्थिती कोरोनाने करून ठेवली होती. मार्च 2020 पासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना आता हद्दपार होऊ लागला आहे.
तिन्ही लाटांमध्ये शहरातील एक हजार 505 तर ग्रामीणमधील तीन हजार 725 जणांचा बळी घेणारा कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे. रविवारी (ता. 6) शहरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही तर ग्रामीणमध्ये तीन रुग्ण वाढले आहेत. शहरात सध्या तीन तर ग्रामीणमध्ये कोरोनाचे केवळ 54 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, मोहोळ, माढा या चार तालुक्यात साडेचारशेहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काही क्षणात होत्याचे नव्हते करून हसत्या खेळत्या कुटुंबाला दु:खाच्या खाईत लोटणारा कोरोना आता शांत होऊ लागला आहे. अेनक कुटुंबाचा आधार त्याने हिरावून नेला. नातेसंबंध विसरायला भाग पाडून या जगात खरचं कोण कोणाचा आहे, याची प्रचिती त्याने सर्वांनाच करून दिली. अनेक चिमुकल्यांना वडिल समजण्यापूर्वीच कोरोनाने त्या वडीलाचा बळी घेतला. स्मशानभूमीदेखील गहिवरली, अशी स्थिती कोरोनाने करून ठेवली होती. मार्च 2020 पासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना आता हद्दपार होऊ लागला आहे. कोरोनावरील प्रतिबंधित कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीमुळे व नागरिकांकडून नियमांचे पालन, रात्रंदिवस स्वत:चे कुटुंब सोडून जनतेच्या रक्षणार्थ रस्त्यावर पहारा देणारे पोलिस प्रशासन, रात्रंदिवस ड्यूटी किती तासांची याचा विचार न करता रुग्णसेवा करणाऱ्या त्या डॉक्टर व नर्सेस, आशासेविकांमुळेच ते शक्य झाले आहे. त्याला शासनाच्या वेगवेगळ्या आदेशांचीही मदत झाली. अनेक मंत्र्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी लॉकडाउन काळात राजकारणापेक्षाही समाजसेवाच श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले. आता सोलापूर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून ग्रामीणमधील चिंता दूर झाली असून दक्षिण सोलापूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे तर बहुतेक तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत.
कोरोनाची तिन्ही लाटांमधील स्थिती
एकूण टेस्ट
34,39,426
एकूण कोरोना पॉझिटिव्ह
2,19,665
कोरोनाचे बळी
5,230
कोरोनामुक्त रुग्ण
2,14,378
उपचार घेणारे रुग्ण
57
तालुकानिहाय रुग्ण व मृत्यू (कंसात सक्रिय रुग्ण)
तालुका रुग्ण मृत्यू
अक्कलकोट 4,840 211 (2)
बार्शी 24,820 515 (5)
करमाळा 17,312 229 (11)
माढा 23,988 451 (9)
माळशिरस 35,541 508 (3)
मंगळवेढा 10,384 206 (4)
मोहोळ 10,782 440 (3)
उत्तर सोलापूर 3,352 163 (1)
पंढरपूर 36,571 672 (7)
सांगोला 13,863 147 (9)
दक्षिण सोलापूर 4,558 183 (0)
एकूण 1,86,011 3,725
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.