कोरोना  sakal media
सोलापूर

सोलापूर 'सिव्हिल'मधील डॉक्‍टर्स व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक! सोलापूर 'सिव्हिल'मधील डॉक्‍टर्स व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील दहा दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सोलापूर : शहरामध्ये बुधवारी तब्बल 139 कोरोनाचे (Covid-19) रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये 36 पॉझिटिव्ह रुग्ण हे केवळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopcahr Rugnalaya) (Civil Hospital) काम करणारे डॉक्‍टर्स (Doctor) आणि कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता शहर व जिल्हा तिसऱ्या लाटेकडे जात असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या झपाट्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील दहा दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. (Corona report of doctors and staff of Civil Hospital has come positive)

याबाबत सिव्हिल हॉस्पिटल सूत्रांकडून अधिक माहिती घेतली असता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी कुणाचीही प्रकृती गंभीर नाही, सर्व सुरक्षित आहेत. काही जणांना सिव्हिलमध्ये ऍडमिट करण्यात आले असून काहीजण होम आयसोलेट (Home Isolation) आहेत. तर ग्रामीण भागामध्ये तब्बल 142 नवीन रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये बार्शीतील (Barshi) 43 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

शहरात बुधवारी विविध प्रभागांतील कोरोनाचा 938 जणांचा रिपोर्ट आला असून, यात 139 पॉझिटिव्ह आले तर तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले. शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 441 आहे. तर ग्रामीणमधील 1259 जणांचा अहवाल आला असून, यात 142 जण पॉझिटिव्ह आले आहेत. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 29 असून, ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 462 झाली आहे. सध्या शहर व ग्रामीणमधील एकूण रुग्णांची संख्या 903 झाली आहे. शहर व ग्रामीणमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT