counselling sakal
सोलापूर

Solapur News : समुपदेशनाने संपेल तुमच्या आयुष्यातील निराशेचा अंधार

व्यक्तीची एकांगी विचाराने निराशेचा वाढता अंधार, पती-पत्नीचे वाद, भयगंड या समस्यांवर समुपदेशकाच्या मदतीने सहज मात करता येऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - व्यक्तीची एकांगी विचाराने निराशेचा वाढता अंधार, पती-पत्नीचे वाद, भयगंड या समस्यांवर समुपदेशकाच्या मदतीने सहज मात करता येऊ शकते, हे अनुभव जीवनाबद्दलच्या सकारात्मकतेला बळ देणारे ठरत आहेत.

समुपदेशनाच्या माध्यमातून घडलेल्या यशकथामधून नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा प्रवास सांगणाऱ्या काही घटना.

आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडलेला तरुण

परराज्यातील एक तरुण पदवी शिक्षणासाठी सोलापुरात आला. अचानक दोन तीन दिवस तो कॉलेजला आला नाही. शिक्षकांनी जागरूकपणे समुपदेशकास त्याच्या भेटीसाठी पाठवले. समुपदेशकाने रुमचा दरवाजा वाजवला तेव्हा तो अस्वस्थ विद्यार्थी चकितच झाला.

दुरच्या प्रदेशात आपल्या भेटीसाठी कोणी येऊ शकते हा प्रसंग त्याचासाठी टर्निंग पॉइंट ठरला. मग तो भाषेचा अडथळा दूर सारून मनमोकळे बोलू लागला. मग तो एकटाच पंख्याकडे पाहत विचार करत आत्महत्या केल्यावर काय होईल याचा विचार करत असे. त्याने रात्री आत्महत्या करण्याचे ठरवले होते.

त्याच्याशी संवादात त्याचा होमसीकनेस, अभ्यास कसा करावा न समजणे व एकाकी राहणे या समस्या समोर आल्या. समुपदेशकाने त्याला तो कोणत्या ध्येयाने आला व आईबाबांची अपेक्षा समजून सांगितल्या. मैत्री व संवादातून त्याच्या मनावरील ताण कमी झाल्याने तो अभ्यासाला लागला.

वकीलसाहेब घटस्फोटाचा अर्ज रद्द करा

पती व पत्नीमध्ये सततच्या भांडणामुळे या दांपत्याने घटस्फोटाचा अर्ज केला. वकिलांनी अर्ज स्वीकारून न्यायालयात दाखल केला. तेव्हा एका स्नेह्याने त्यांना समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला. हे दांपत्य अगदीच वेगळेच तर व्हायचे म्हणून तावातावाने समपुदेशकाकडे आले.

दोघांनी परस्‍पराबद्दलच्या भांडणाचे सर्व प्रसंग सविस्तरपणे मांडून एकमेकांना दोष देण्यास सुरवात केली. त्यांचे बोलणे झाल्यानंतर समुपदेशकांनी त्यांच्या भांडणाची मुळ कारणे किरकोळ असून केवळ शब्दाने शब्द वाढल्याची ही भांडणे असल्याचे निरीक्षण नोंदवताच त्यांनी ते मान्य केले. मग घटस्फोटाचा अर्ज वकिलांकडून रद्द करण्यात आला.

दवाखाना पाहिला अन पायच गेले

एक मध्यमवयाच्या महिलेला अचानक गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला. त्यांना चालता येईनासे झाले. ताबडतोब सर्व दवाखाने झाले व तपासण्या झाल्या. पण त्यात काहीच निदान झाले नाही. पण महिलेला अगदी कमी वयात चालता येत

नव्हते. आजाराचे निदान होत नाही म्हणून त्यांनी समुपदेशकांची भेट घेतली. त्यांच्या जीवनातील सर्व प्रसंगाची माहिती त्यांनी जाणून घेतली.

तेव्हा असे समजले की ही महिला एकदा हाडाच्या दवाखान्यात गेली होती. तेव्हा तेथे अनेक बेडवर गुडघेदुखीचे रुग्ण मोठ्या संख्येने पाहिले. तेव्हा पासून आपले गुडघे जाणार व चालणे बंद होणार याविचाराने त्यांना ग्रासले. त्यामुळे त्यांचे चालणे बंद झाले. समुपदेशकांनी त्यांच्या मनातील भयगंड काढला अन त्या सुरळीत चालू लागल्या.

मानवी मनांची गुंतागुंत समजून घेत संवादातून योग्य व्यवहारीक पातळीवर मानवी वर्तन आणण्यासाठीचे प्रयत्न समुपदेशनातून केले जातात. त्याचा उपयोग समस्याग्रस्त व्यक्तीसाठी होऊ शकतो.

- अलका काकडे, समुपदेशक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT