Covid_Care 
सोलापूर

माढा, कुर्डुवाडी, टेंभुर्णीला कोव्हिड सेंटर मंजूर ! रुग्णांवर उपचार करणे शक्‍य

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : सध्या देश व राज्यामध्ये कोव्हिड-19 ची दुसरी लाट आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने माढा मतदार संघातील माढा, कुर्डुवाडी व टेंभुर्णी येथे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळाली असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

आमदार बबनराव शिंदे म्हणाले, राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असून, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्येही त्याचा प्रभाव वाढत आहे. माढा तालुका व माढा मतदारसंघातील काही गावांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, कोरोनाबाधित रुग्णांवर योग्यवेळी उपचार होण्याच्या दृष्टीने माढा, कुर्डुवाडी व टेंभुर्णी या ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार शासकीय वसतिगृह माढा, शासकीय वसतिगृह, कुर्डुवाडी व संकेत मंगल कार्यालय, टेंभुर्णी येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळाली असून, येत्या दोन दिवसांत या तीनही ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू होणार आहेत. 

सध्या माढा तालुक्‍यातील रोपळे (क), मानेगाव, उपळाई बु, मोडनिंब, परिते, पिंपळनेर, टेंभुर्णी, आलेगाव बु या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांसह माढा ग्रामीण रुग्णालय, कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एकत्रित मिळून 500 पेक्षा जास्त ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. मागील वर्षी देखील माढा, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, म्हाळुंग व इतर ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू करून बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार शिंदे दिली. 

नियम पाळा 
नागरिकांनी कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्क, हॅंड सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या बाबींचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT