Crime of molestation against Manoj Shejwal  sakal
सोलापूर

मनोज शेजवालविरुध्द विनयभंगाचा गुन्हा

विष पाजल्याचाही आरोप; पोलिस करत आहेत गुन्ह्याची खात्री

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महिलेच्या साडीचा पदर ओढून तिला जबरदस्तीने विष पाजले. तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी नगरसेवक मनोज शेजवालविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार शेजवालविरुध्दच्या गुन्ह्याची खात्री पोलिसांकडून केली जात आहे.

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार त्या महिलेच्या पतीचे व संशयित आरोपी दीपक राजगुरु यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. १२ फेब्रुवारी रोजी ती महिला किरणा साहित्य आणायला घराबाहेर पडली होती. त्यावेळी त्याठिकाणी थांबलेल्या कारमध्ये नगरसेवक शेजवाल बसला होता. त्याच्याबरोबर दीपक राजगुरु, किरण राजगुरु व आकाश सनके हेदेखील होते. त्यावेळी शेजवालने पीडित महिलेला कारकडे बोलावले. ती महिला त्याच्याकडे गेली असता, तुझा नवरा एका ठिकाणी थांबला आहे, काही दिवसांपूर्वी दीपकसोबत त्याचे भांडण झाले होते, ते मिटवायचे असल्याचे पीडित महिलेला सांगण्यात आले. त्यानंतर गाडीतील किरण राजगुरु याने त्या महिलेचा हात धरून आत ओढले. त्यावेळी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताना त्यांनी गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाडी सुरु करून पुढे निघाले. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या आकाश सनके याने महिलेला शिवीगाळ केली.

तर शेजवाल याने पदर ओढला. काही वेळात काही एका ठिकाणी थांबविली. शेजवाल याने गळा दाबून खिशातील विषाची बाटली काढली आणि महिलेच्या तोंडात ओतली. महिला त्याठिकाणी बेशुध्द पडली. त्यानंतर त्या मला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार नगरसेवक शेजवालसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.

अटकेपूर्वी गुन्ह्याचा सखोल तपास

नगरसेवक मनोज शेजवाल याच्यासह त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी विनयभंग केला, अपहरणाचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचाही प्रयत्न केला, असे फिर्यादीचे म्हणणे आहे. गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या फिर्यादीने सांगितलेल्या बाबींची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT