Farmer Agitation sakal
सोलापूर

Mangalwedha News : पिक विम्यावरून शिवसेनेचा शेतकऱ्यासमवेत कृषी कार्यालयात ठिय्या

विमा कंपनीच्या शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने शेतकऱ्यासमवेत कृषी कार्यालयात ठिय्या मांडत विमा प्रतिनिधीला दोन तास थांबवून ठेवले.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत खरीप पिक विम्याची रक्कम ओरिएंटल कंपनीने अद्याप जमा न केल्यामुळे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यासमवेत कृषी कार्यालयात विमा कंपनीच्या प्रतिनिधीला घेराव घालण्यात आला. यावेळी प्रा. येताळा भगत व विमा प्रतिनिधीत भरपाई वरून खडाजंगी झाली.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत गतवर्षी खरीप हंगामा तालुक्यातील 66 हजार शेतकऱ्यांनी 52 हजार हेक्टरवर बाजरी, तूर, मका, कांदा या पिकाचा विमा भरला. दुष्काळी परिस्थितीत विमा कंपनीने 8 मधील 5 सर्कलमध्ये ॲग्रीम रक्कम मंजूर करताना बोराळे मरवडे आणि भोसे या मंडल मधील शेतकरी वगळले.

मंजूर पाच सर्कलमधील बाजरी व मका या पिकाला ऍग्रीम 25 टक्के दिले 75 टक्के ॲग्रीम देण्यास विमा कंपनीने हात वर केले. तर ज्या शेतकऱ्याने तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांमधील काही शेतकरी वंचित ठेवले. तर दुष्काळी परिस्थितीमुळे पीक जळून गेलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी विमा कंपनीने फेटाळल्या. विमा कंपनीच्या शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने शेतकऱ्या समवेत कृषी कार्यालयात ठिय्या मांडत विमा प्रतिनिधीला दोन तास थांबवून ठेवले.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, शेतकरी संघटनेचे रामचंद्र सारवडे, जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, गणेश गावकरे, रेवणसिद्ध बिराजदार, लक्ष्मण निकम, महादेव साखरे, आदी सह तालुक्यातील 200 पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांची रक्कम 31 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करून तक्रारीचे निरीक्षण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलन थांबवले

तालुका दुष्काळ जाहीर असताना विमा कंपनीने शेतकऱ्याला वगळून अन्याय केला. सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम तातडीने जमा करावी अन्यथा 20 ऑगस्ट पासून पुणे येथील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.

- रामचंद्र सारवडे, शेतकरी संघटना

विमा कंपनीच्या चुकीच्या निकषाने तालुक्यातील शेतकऱ्याला वंचित ठेवले. वंचित शेतकऱ्यांना विमा कंपनीने तातडीने न्याय द्यावा अन्यथा शेतकऱ्यासमवेत धडक मोर्चा काढणार.

- प्रा. येताळा भगत, तालुकाध्यक्ष शिवसेना उबाठा गट

तालुक्यातील कांदा व बाजरीचा विमा भरलेल्या 33 हजार शेतकऱ्यांना सरसकट विमा 7 कोटी 31 रक्कम जमा होणार आहे. ती रक्कम 31 ऑगस्ट पर्यंत जमा होईल.

- गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT