श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना  sakal
सोलापूर

साखर कारखाना ; दामाजी शुगर' मध्ये करेक्ट कार्यक्रम कुणाचा? मतदारराजा करणार फैसला...

मंगळवेढ्यात दामजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडनुकीत कोणाच्या बाजुने येणार आज निकाल?

सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (सोलापूर): मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याचा राजवाडा असलेला श्री संत दामाजी साखर कारखान्याची निवडणुकीचा फैसला आज रोजी होत असून मतदानास सकाळपासून मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार ? तसेच उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत 14 जुलै रोजी दिसून येणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अंतिम मतदार यादीतील गटनिहाय मतदान पुढीलप्रमाणे असून

मंगळवेढा–४६३७ , ब्रह्मपुरी ६१४२, मरवडे ६२००, भोसे -६०३६, आंधळगाव ५५२०, संस्था मतदार – १६० एकूण = २८ हजार ५३५ मतदार आहेत.

"जो पत्ता करतो गुल, पॉवरफुल्ल… यंदा गुलाल आमचाच ", म्हणत दोन्हीही पॅनल कडून शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात असणारी गावातील गल्ली बोळ, वाडी वस्ती, चौक पिंजून काढत सभेला जोर देत मतदार पर्यंत होम टू होम प्रचार करत जो तो आपल्या परीने आश्वासनाची खैरात करीत आमच्या पॅनल ला मतदान करावे अशी विनंती करीत कडवी झुंज देत असून श्री संत दामाजी साखर सहकार संस्थेची दंगल पाहावयास मिळत आहे.

आज सकाळपासून ढगाळ वातावरणात व पावसाची रिपरीप असून श्री संत दामाजी शेतकरी विकास आघाडी पॅनल व समविचारी आघाडी पॅनल यांच्यात तुल्यबळ सामना होत असून जो तो आपल्या परीने सभासद यांना भेटण्यासाठी व समजावून सांगत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आपला हक्क बजावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सत्ताधारी असणाऱ्या श्री संत दामाजी विकास आघाडी पॅनल कडून भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांनी तालुक्यातील असनाऱ्या ऊस उत्पादक व दक्षिण भागातील बिगर ऊस उत्पादक भागातील दौरे ,प्रचार, गाठीभेटी व सभेला जोर लावत गर्दी करून संत दामाजी समविचारी पॅनलवर जोरदार टीका करत प्रचार यंत्रणा राबवली होती. प्रथमच तालुक्यात श्री संत दामाजी कारखान्यात निवडणुकीत सर्व गट तट, पक्ष सोडून एकत्र बैठक घेत अड नंदकुमार पवार, शिवाजीराव काळूंगे,शिवानंद पाटील,दामोदर देशमुख,तानाजी खरात,अजित जगताप आदी.श्री संत दामाजी समविचार पॅनलच्या स्थापना करत सत्ताधारी असणाऱ्या आमदार आवताडे यांना कडवे आव्हान दिले आहे. समविचार पॅनल कडून सहा वर्षांमध्ये सत्ताधारी असणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकानी केलेल्या कारभाराबद्दल ऊनी धूनी काढत व झालेल्या कारखान्यातील भ्रष्टाचार यावर सडकून टीका करत जनतेतून प्रचार दौरे, सभेला असणारी प्रचंड गर्दी, मतदारापर्यंत भेट घेत कडवे आव्हान दिले आहे.

श्री संत दामाजी साखर कारखान्यातील असणारे 28 हजार 535 सभासद असलेले मतदार दामाजीची सत्ता कोणाकडे द्यायचा याचा फैसला आज होणार असून करेक्ट कार्यक्रम कुणाचा.? कोणाचे भविष्य आजमावणार असून दामाजीची सेवा करण्याची संधी कोणास मिळणार आहे हे मतदान रुपी कळणार आहे.

दामाजी साखर कारखान्याच्या मतदानाच्या मतपेटी मधून होणारी मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यात पडणार आणि कोण विजय होणार? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून प्रथमच श्री संत दामाजी विकास आघाडी पॅनल व संत दामाजी समविचार पॅनल यांच्याकडून प्रतिष्ठेची लढत असून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मतदानासाठी मतदारापर्यंत पोहोचत विजय होण्यासाठी सामना करण्याचे चित्र पाहावयास मिळत असून दोन्ही पॅनेल कडून सत्ता आमची येणार अशी स्पर्धा करीत असून

दोन्हीही उमेदवार व कार्यकर्त्याकडून धावपळ करीत मतदान आपल्या पॅनेलला पदरात पाडण्यासाठी विनवणी करीत निवडून द्यावे अशी सहानुभूती निर्माण करीत आहे. तरी 14 जुलै रोजी दामाजीच्या आखाड्यातील ही दंगल कोणाच्या पारड्यात झुकते येणारा काळच ठरवेल तसेच कोणास दामाजीची सेवा करण्याची संधी मिळणार ? हे मत पेटीतून दिसणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT