सरव्यवस्थापकाच्या त्रासामुळे डीसीसी कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती! Sakal
सोलापूर

सरव्यवस्थापकाच्या त्रासामुळे डीसीसी कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती!

सरव्यवस्थापकाच्या त्रासामुळे डीसीसी कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती!

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी सोलापूर जिल्हा बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांना पाठविलेल्या अहवालावर आता काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (Solapur District Central Co-operative Bank) सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे (K. V. Mote) यांच्या चौकशीच्या अहवालात कर्मचाऱ्यांच्या मानसिक त्रासाचाही मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला आहे. मोटे यांच्या त्रासाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याने अनेकांनी चौकशी अधिकारी जे. के. तांबोळी (J. K. Tamboli) यांना सांगितले आहे. त्यांनी सर्व मुद्दे या चौकशी अहवालाच्या माध्यमातून समोर आणले आहेत.

विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी सोलापूर जिल्हा बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांना पाठविलेल्या अहवालावर आता काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोटे यांनी जिल्हा बॅंकेच्या प्रभारी सरव्यवस्थापक पदाचा पदभार घेतल्यापासून 74 जणांनी स्वच्छ निवृत्ती घेतली आहे. त्यापैकी 14 कर्मचाऱ्यांनी लेखी म्हणणे सादर केले आहे. त्यातील बहुतांश जणांनी सरव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून झालेला मानसिक त्रासाचे कारण दिले आहे.

वेतनाची अडवणूक करणे, वारंवार आणि अनियमित बदली करणे, नोटा बंदीच्या काळात नोटा घेण्यास दबाव टाकणे, शाखेस पुरेसा कर्मचारी वर्ग न देणे, आजारपणाबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करूनही वैद्यकीय रजा मंजूर न करणे यासह अन्य प्रकारचे मानसिक त्रास होत असल्याने नोकरीचा राजीनामा दिल्याचा लेखी खुलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात चौकशी अधिकारी तांबोळी यांनी मोटे यांच्याकडे खुलासा मागितला होता. या प्रकरणी मोटे यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा दिला नसल्याचे चौकशी अधिकारी तांबोळी यांनी या अहवालात म्हटले आहे. मोटे यांच्या वर्तनात वेळीच सुधारणा व्हावी, सुधारणा न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गंभीर कारवाई करण्यात येईल, अशी समही तत्कालीन चेअरमन यांनी दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

'नाबार्ड'चेही गंभीर आक्षेप

सोलापूर जिल्हा बॅंकेची नाबार्डच्यावतीने झालेल्या तपासणीत बॅंकेच्या आर्थिक स्थितीबद्दल, थकीत कर्जाबद्दल सरव्यवस्थापक मोटे यांच्यावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यांचे कामकाज बॅंकेच्या हितावह वाटत नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT