सोलापूर : देशातील रेल्वेची प्रवासी वाहतूक 14 एप्रिलपर्यंत पूर्णत: बंद आहे. त्यामुळे रेल्वेला दररोज सुमारे बाराशे कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसू लागला आहे. आता लॉकडाऊनच्या काळात जीवनाश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी विशेष पार्सल गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
हेही नक्की वाचा : ठाकरे सरकार काढणार 60 हजार कोटींचे कर्ज
ज्या नागरिकांना अत्यावश्यक साधन सामुग्री बाहेरगावी पाठवायची असल्यास त्यांना जवळील रेल्वे स्टेशनमधील मुख्य पार्सल पर्यवेक्षकाकडे संपर्क करावा लागणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आता पार्सल पुरविण्यासाठी यंशवतपूर- निझामुद्दिन अशी मालवाहतूक रेल्वे सुरु केली जाणार आहे. ही रेल्वे यंशवतपुरहून सोमवारी (ता.6) व 13 एप्रिल रोजी धावणार आहे. निझामुद्दिन ते यंशवतपुर ही गाडी निझामुद्दिनहून 8 एप्रिल व 15 एप्रिलला धावणार असून इच्छूकांनी संपर्क करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
हेही नक्की वाचा : कोरोनाची वाटेना भिती ! सामुहिक नमाज पठणप्रकरणी 87 जणांविरुध्द गुन्हे
सर्व स्थानकांवर आरपीएफचे जवान
पार्सलची लोडींग आणि अनलोंडिग थांबा दिलेल्या वेळेत करणे आवश्यक आहे. या विशेष पार्सल गाडीत कोणत्याही प्रवाशाला बसता येणार नाही. प्रवाशांनीही मालवाहतूक गाडीतून प्रवास करु नये, अन्यथा त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर संबंधित रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मालवाहतूक रेल्वे ज्या स्थानकांवरुन धावणार आहे, त्याठिकाणी आरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून या रेल्वे गाडीच्या हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे.
हेही नक्की वाचा : सोलापुरात सोशल डिस्टन्सचे तीन- तेरा
या स्थानकांवरुन धावणार पार्सल रेल्वे
रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार पार्सल पुरविण्यासाठी यंशवतपूर- निझामुद्दिन व निझामुद्दिन- यशवंतपूर ही पार्सल रेल्वे सुरु केली जाणार आहे. यशवंतपूर, धर्मावरम, रायचूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, दौण्ड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, आग्रा कैंट, मथुरा, पलवल, निझामुद्दिन या रेल्वे स्थानकांवरुन धावणार आहे. तर त्या स्थानकांवर या गाडीला थांबे देण्यात आले आहेत.
हेही नक्की वाचा : सिध्देश्वर एक्स्प्रेसचे ऑनलाइन बुकिंग हाउसफूल्ल
6 ते 15 एप्रिलपर्यंत प्रत्येकी दोन फेऱ्या
रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानुसार पार्सल पुरविण्यासाठी यंशवतपूर- निझामुद्दिन व निझामुद्दिन- यशवंतपूर ही पार्सल रेल्वे सुरु केली जाणार आहे. या रेल्वेच्या प्रत्येकी दोन फेऱ्या होणार आहेत.
- प्रदिप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.