Chokhoba Smarak Samiti met CM Eknath Shinde esakal
सोलापूर

Eknath Shinde : चोखोबा स्मारकाचा 'तो' प्रश्न लवकरच मार्गी लावणार; मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं शिष्टमंडळाला आश्वासन

हुकूम मुलाणी ​

मुख्यमंत्री शिंदेंनी या निवेदनावर तातडीने जिल्हाधिकारी व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा करून तात्काळ यावर लक्ष घालण्याची सूचना दिल्या.

मंगळवेढा : प्रलंबित चोखोबा स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवेढ्यातील चोखोबा स्मारक समितीच्या (Chokhoba Memorial Committee) शिष्टमंडळांना दिले. आषाढी वारीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रलंबित चोखोबा स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन मंगळवेढा येथील स्मारक समितीच्या वतीने त्यांना देण्यात आले.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आ. समाधान अवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्मारक समितीचे अविनाश शिंदे, जयराज शेंबडे, सोमनाथ आवताडे, राजवीर हजारे, प्रफुल्ल सोमदळे, भरत राजपुरोहीत, गणेश ओमणे, राज शिंदे, विनायक कलुबर्मे, सतीश दत्तू आदींसह स्मारक समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. चार दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या सभागृहात प्रलंबित चोखोबा स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी सर्वपक्षीय व स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली. त्या बैठकीमध्ये वेगळी मतांतरे मांडण्यात आली.

त्यामध्ये थेट निधी देण्याची तर काहींनी स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, तर काहींनी व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन स्मारक करावी अशी मागणी केली. मात्र, हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर प्रलंबित असून मुख्यमंत्री हे पंढरपूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळताच समिती सदस्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना थेट भेटून हा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर येथे समक्ष भेट घेत अविनाश शिंदे यांनी स्मारकाचा विषय आपल्या स्तरावर प्रलंबित असून तो तात्काळ मार्गी लावा, या स्मारकामुळे तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे.

संत चोखोबा संदर्भात अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले सांगितले, अशी विनंती करत त्या संदर्भातील निवेदन सादर केल्यानंतर मुख्यमंत्री या निवेदनावर तातडीने जिल्हाधिकारी व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा करून तात्काळ यावर लक्ष घालण्याची सूचना दिल्या व स्मारकाचे प्रश्न तात्काळ लवकरच आश्वासन दिले. त्यानंतर या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेत हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. प्रलंबित स्मारकाच्या संदर्भात वारी परिवाराच्या पुढाकाराने गती देण्याचा प्रयत्न केला, त्याला या आठवड्यात चांगलीच गती मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT