Kem 
सोलापूर

केमला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर होत आहे उड्डाणपुलाची मागणी ! 

सचिन बिचितकर

केम (सोलापूर) : केम ते करमाळा, कुर्डुवाडी तसेच परंडा या प्रमुख बाजारपेठेला जोडणारा रस्ता हा केममधील रेल्वे मार्गाच्या खालून एका लहान पुलातून जातो. मात्र या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहतुकीचा मोठा प्रश्‍न निर्माण होत असल्याने केमला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर उड्डाणपुलाची मागणी होत आहे. 

केम हे करमाळा तालुक्‍यातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर कुर्डुवाडी आणि जेऊर यांच्यामध्ये हे रेल्वे स्टेशन येते. तसेच केमच्या बाजारपेठेला जोडणारी इतर लहान गावे, वाड्या, वस्त्या यांच्यादेखील वाहतुकीचा प्रमुख मार्ग हा रेल्वेचा पूल आहे. तसेच कंदर येथील प्रमुख राज्यमार्ग तसेच नव्याने काम सुरू असलेला शिर्डी-पंढरपूर मार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता हा केममधूनच जातो. पण पुलाखालून गेलेला रस्ता हा सध्या राहिलेला नाही. हा रस्ता पूर्णपणे खचला असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यातून वाट शोधत जाणाऱ्या वाहनांना जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागते आहे. 

या पुलाखालील रस्त्याचे काम खूप वेळा करण्यात आले. वेळोवेळी डागडुजी करण्यासाठी केम ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला व रस्त्याच्या कामात मदत केली आहे. पण साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अनुकूल ड्रेनेज सिस्टीमचा अभाव असल्याने दरवेळी, दरवर्षी पाऊस झाला की रस्ता खचतो, पुन्हा खड्डे पडतात. दरवर्षी पहिले पाढे पंचावन्न अशी या रस्त्याची स्थिती आहे. यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून केम गावातील नागरिक तसेच आसपासच्या गावातील नागरिकांकडून या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर उड्डाणपूलच आवश्‍यक असल्याची मागणी होत आहे. दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नाही व यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा वाहतूकदारांकडून व्यक्त होत आहे. 

याबाबत केम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित तळेकर म्हणाले, रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयाने वेळोवेळी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केम ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून आम्ही रेल्वे प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे उड्डाणपुलाची मागणी केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावाविषयी रेल्वे प्रशासन व शासनाने याबाबत प्राधान्यक्रमाने विचार करावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

तो सरळ सरळ खोटं... गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर नीलमने सोडलं मौन; म्हणते- ते सगळं फक्त

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

SCROLL FOR NEXT