Remdesivir 
सोलापूर

पंढरपूर, बार्शी, करमाळ्यात रेमडेसिव्हिरची वाढली मागणी ! सध्या अकराशे इंजेक्‍शनचाच साठा

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बार्शी, करमाळा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्‍यांतून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची मागणी वाढत आहे. रुग्णाला वाचविण्यासाठी दररोज एक, या प्रमाणात चार ते पाच दिवस ते इंजेक्‍शन त्या रुग्णाला टोचले जाते. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी तीन दिवसांपूर्वी 314 तर बार्शीच्या उपजिल्हा रुग्णालयाला 96 आणि करमाळ्याला 48 इंजेक्‍शन देण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात 12 एप्रिल 2020 रोजी कोरोनाचे आगमन झाले. त्यानंतर कोरोनाला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच जिल्ह्याची रुग्णसंख्या 67 हजारांकडे वाटचाल करू लागली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दोन हजार 28 रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या सात हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने खासगी व सरकारी रुग्णालयातून रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. लक्षणे असतानाही उपचारासाठी स्वत:हून पुढे न येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. त्यामुळे तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची गरज भासू लागली आहे. 29 मार्चनंतर जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची मागणीही वाढत आहे. 

ग्रामीणमधील "रेमडेसिव्हिर'ची स्थिती 

  • आतापर्यंत आलेले इंजेक्‍शन : 9750 
  • रुग्णांसाठी दिलेले इंजेक्‍शन :8676 
  • इंजेक्‍शन शिल्लक : 1074 

तीन तालुक्‍यांतच साडेपाचशे मृत्यू 
ग्रामीण भागातील एक हजार 216 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये 11 तालुक्‍यांपैकी बार्शी (232), करमाळा (69) आणि पंढरपूर (253) या तीन तालुक्‍यांतील 554 रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 473 रुग्ण आढळले असून त्यापैकी 22 हजार 112 रुग्ण याच तीन तालुक्‍यांतील आहेत. ग्रामीण भागातील तीन हजार 885 ऍक्‍टिव्ह रुग्णांपैकी एक हजार 819 रुग्ण या तीन तालुक्‍यातील आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी, करमाळा, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयांतील रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध करून दिले जात आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Press Conference: ठाकरेंना पराभवाचा धक्का! त्यातच अजित पवारांनी जखमेवर मीठ चोळलं, पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

NCP Manoj Kayande Won Sindkhed Raja Election 2024 final result live : 'सिंदखेड राजा'त मनोज कायंदे ठरले 'राजा'? शिंगणेंचा पराभव

Raj Thackeray reaction : अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...! निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : परंडा मतदारसंघातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत 1510 मतांनी विजयी

Amgaon Assembly Election Results 2024 : आमगाव मतदारसंघात भाजपने गड राखला! संजय पुरम 110123 बहुमताने विजयी

SCROLL FOR NEXT