Madha Loksabha sakal
सोलापूर

Madha Loksabha : सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलण्याचं काम मोदी सरकारने केलं ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. उद्याचा विकसित भारत बनविण्यासाठी, भारताचे मजबूत पंतप्रधान बनविण्यासाठी यावेळी आपलं मत भाजपला नाही तर भारताला दिले पाहिजे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. उद्याचा विकसित भारत बनविण्यासाठी, भारताचे मजबूत पंतप्रधान बनविण्यासाठी यावेळी आपलं मत भाजपला नाही तर भारताला दिले पाहिजे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. 28) रोजी सांगोला शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या सभेसाठी आमदार शहाजी पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, पाटील, दौलत शितोळे, चेतनसिंह केदार सावंत, भाऊसाहेब रूपनर, श्रीकांत देशमुख, सोमा मोटे, तानाजी पाटील, संभाजी आलदर, दादासाहेब लवटे, अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, राणी माने, राजश्री नागणे, खंडू सातपुते, शिवाजीराव गायकवाड, विजय बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

'काय ही गर्दी, काय तो उत्साह, काय ती जिंकण्याची तयारी, इथं सगळं ओकेमधी हाय' अशी आपल्या भाषणाने सुरुवात करीत उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून इथला राहिलेला विकास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केला आहे. विकासातील मूलभूत गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

आजपर्यंत माढ्याच्या राजकारणात सांगोल्याचं पाणी अडवण्याचे प्लॅनिंग व्हायचं, परंतु आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रत्यक्ष पाणी दिले गेलं आहे. आमदार शहाजी पाटील यांच्या भाषणाचा धागा पकडत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की राहिलेल्या सर्वच योजनांना मी निधी कमी पडू देणार नाही. कारण तिजोरीच्या चाव्या तुमच्याच हातात आहेत. निधीची कोणतीच काळजी करू नका. विरोधात असणाऱ्यांना गेल्या अनेक वर्षात तुम्ही कोणत्या विकासाची कामे केली आहेत एवढेच विचारा. खासदार निंबाळकर साहेबांची कामे तर तुमच्या समोरच आहेत. त्यामुळे उद्याचा विकसित भारत बनविण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मत आहे हे मात्र विसरू नका असेही शेवटी त्यांनी सांगितले.

आम्ही विकास करुन दाखविला -

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, सांगोला, माढा, करमाळा, माळशिरस, माण, खटाव इत्यादी सर्वच तालुक्यांमध्ये आम्ही रखडलेल्या योजना मार्गी लावण्याची काम केले आहे. सांगोल्यातील टेंभू, म्हैसाळ, निरा उजव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत दिले. आज दुष्काळात तालुक्यात टँकर लावण्याची वेळ असताना माण नदीत पाणी वाहत हे आम्ही करून दाखवले आहे. परंतु शरद पवारांनी आज पर्यंत माढा मतदारसंघाचा विकास करण्यापेक्षा फक्त बारामतीचाच विकास केला. त्यांनी जातीपातीमध्ये भांडणे लावण्याची काम केले आहे. आरक्षणाचा प्रश्न पुढे मांडून जनतेची विकासापासून दिशाभूल करीत आहेत.

मोहिते पाटलांनी सांगोला वाळवंट केला -

आमदार शहाजी पाटील बोलताना म्हणाले की, मोहिते पाटलांनी आपला तालुका वाळवंट केला आहे. आपले हक्काचे पाणी त्यांनी अडवण्याचे काम आजपर्यंत केले आहे. यापुढे शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी निंबाळकरांना पुन्हा खासदार करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT