Shivsena Criticize Devendra Fadnavis Sakal
सोलापूर

राजाभाऊंचं ठरलं, संजयमामांच्या भूमिकेकडे लक्ष! देवेंद्र फडणवीस शनिवारी सोलापुरात

१५ अपक्ष आमदारांच्या निर्णायक मतांवर महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष आमदार संजय शिंदे आणि राजेंद्र राऊत यांना महत्त्व आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने धनंजय महाडिक यांच्या रुपाने सातवा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. पण, १५ अपक्ष आमदारांच्या निर्णायक मतांवर महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष आमदार संजय शिंदे आणि राजेंद्र राऊत यांना महत्त्व आले आहे. दरम्यान, राजेंद्र राऊत हे भाजपसोबत जातील हे निश्चित मानले जात आहे. पण, २०१९ ला सत्ता स्थापनेत सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर करणारे आणि नंतर महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे आमदार संजय शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेसाठी १० जूनला मतदान होणार आहे. तत्पूर्वी, अपक्ष आमदारांशी भाजपसह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी संपर्क वाढविला आहे. शिवसेनेच्या दोन्ही जागांवरील उमेदवार विजयी होण्यासाठी स्वत: पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अपक्षांशी संपर्क सुरु केल्याची चर्चा आहे. खासदार संजय राऊत हे मागील काही महिन्यांपासून सातत्याने भाजपविरोधात पत्रकार परिषदा घेत आहेत. तर छत्रपती संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काही प्रमाणात नाराजी आहे. दुसरीकडे बहुतेक अपक्षांना त्यांच्या मतदारसंघात भाजपपेक्षाही महाविकास आघाडीतील काही पक्षांशीच संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने राज्यसभेसाठी दिलेल्या चार उमेदवारांसाठी १६८ मतांची तंतोतंत गरज आहे. सध्या महाविकास आघाडीकडे १५३ तर भाजपकडे १३५ मते आहेत. महाविकास आघाडीला चौथ्या उमेदवारासाठी १५ मतांची गरज आहे. त्यामध्ये पाच अपक्ष आमदार उघडपणे शिवसेनेसोबत आहेत. मात्र, उर्वरित दहा अपक्ष आमदार कोणाला मतदान करणार, यावर महाविकास आघाडीच्या चौथ्या तर भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेनेचे संजय पवार व भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात हा सामना रंगेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

देवेंद्र फडणवीस शनिवारी सोलापुरात

राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (ता. ४) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. राज्यसभा निवडणुकीबरोबरच आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ते पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनिती ठरवतील, असे पक्षातील नेत्यांनी सांगितले.

अर्ज माघारीनंतर ठरणार निर्णय

विधानसभा निवडणकीच्या निकालानंतर अपक्ष आमदार म्हणून संजय शिंदे यांनी सर्वप्रथम फडणवीस यांना पाठिंब्याचे पत्र दिले होते. पण, राज्यात सत्तांतर झाले आणि पुढे भाजपला त्या पत्राचा काहीच लाभ झाला नाही. पण, राष्ट्रवादीत राहूनही त्यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचे अपूर्ण स्वप्न भाजपमुळेच शक्य झाले होते. त्यांचे आजही फडणवीस यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांसोबतही त्यांचे चांगला स्नेह असून त्यांचा महाविकास आघाडी सरकारला पाठिंबाही आहे. तरीदेखील, त्यांनी अधिकृतपणे अद्याप राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणुकीतून माघार घेण्याची आणखी मुदत असल्याने निवडणूक लागणार की बिनविरोध होणार हे अस्पष्ट आहे. त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे आमदार संजय शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT