Madha Lok Sabha Esakal
सोलापूर

Madha Lok Sabha: धैर्यशील मोहिते-पाटलांच्या हाती तुतारी? शरद पवार गटात शनिवारी प्रवेशाची शक्यता; माढ्याच्या उमेदवारीबाबतही चर्चा

Madha Lok Sabha: माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार पक्षातर्फे कोण उमेदवार असणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळू लागली असून मोहिते-पाटील परिवार शनिवारी (ता. १३) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे.

सकाळ वृत्तसेवा

नातेपुते: माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कोण उमेदवार असणार?, मोहिते-पाटील बंड करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळू लागली असून मोहिते-पाटील परिवार शनिवारी (ता. १३) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पक्षप्रवेश आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांना माढ्यातून उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्‍चित केले होते. तसा त्यांनी प्रसार माध्यमातून प्रचार आणि प्रसारही केला होता. भाजपकडे अतिशय ताकदीने आपणास उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. परंतु भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक-निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून मोहिते पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे मोहिते-पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी सुरू झाली. यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशान फडकवले. त्यानंतर धैर्यशील आणि मोहिते-पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला.

प्रत्येक गावातील आपल्या समर्थकांना तसेच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पारंपारिक विरोधक रामराजे नाईक-निंबाळकर, कै. चिमणराव कदम यांचे चिरंजीव तसेच माण तालुक्यातील प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे आदींना भेटून आपल्याविषयी मते जाणून घेतली.

हे सर्व घडत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपणाकडे खेचून घेण्याचे निश्चित केले होते. ते भाजपच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देऊन होते. दुसरीकडे मोहिते-पाटील परिवाराची भाजपच्या श्रेष्ठींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बंड शमवण्याचा प्रयत्न केला.

परंतु याला यश आले नाही. त्यामुळे खरेच मोहिते-पाटील बंड करणार का? याची उत्सुकता लागून राहिली होती. आज (ता. १०) मोहिते पाटील कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीत धैयशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाली असून अकलूज येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये १३ एप्रिल रोजी मोहिते-पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा १३ एप्रिल रोजी वाढदिवस असून त्याचदिवशी अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील मैदानावर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे समजते.

रणजितसिंह मोहिते-पाटील काय करणार?

एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित झालेले असताना भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील भाजपसोबत राहणार की आपल्या कुटुंबाबरोबर राष्ट्रवादीत जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. रणजितसिंह यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. मात्र, येणाऱ्या आठवड्यात त्यांची भूमिकाही स्पष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT