मंगळवेढा : तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने दामाजी चौकात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मेंढ्यासह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.ऐन आठवडा बाजारादिवशी मेंढरा सह आंदोलक रस्त्यावर आल्याने झाल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत होती.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, माऊली हळणवर, तालुकाध्यक्ष ॲड.रविकिरण कोळेकर, अॅड बापू मेटकरी,अविनाश मेटकरी,अंकुश पडवळे,गेना दोलतोडे,राहुल ढेकळे, गुलाब थोरबोले, रामेश्वर मासाळ,महावीर ठेंगील, विठ्ठल सरगर, बाळासो वाघमोडे, शिवाजी सरगर,
आबा खांडेकर, बंडू वाघमोडे, महादेव इरकर,धनाजी बिचुकले आदी सह तालुक्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते, बी आर एस नेते भगीरथ भालके म्हणाले की, धनगर आरक्षणात र चे ड करून समाज व समाजातील भविष्याच्या पिढीचे मानगूट मुरगाळण्याचे काम नेतेमंडळींनी केले.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे, बहुजन समाजाला राज्यकर्ते गृहीत धरून चालत असेल तर भविष्यातील पिढीसाठी यापेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागेल.
माऊली हळणवर म्हणाले की, संविधानाने 36 नंबर वर धनगराचा प्रश्न र व ड च्या कात्रीत अडकवलेला आहे. शासनाने न्यायालयात धनगर व धनगड हे एकच जात असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने जातीच्या दाखले देण्यास सुरुवात करावी मी जरी आज भारतीय जनता पक्षात असलो तरी आदी समाज नंतर पक्ष नंतर पार्टी ही माझी भूमिका आहे त्यामुळे या समाजाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे.
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड रविकिरण कोळेकर म्हणाले की यापूर्वी 1953 च्या एसटी आरक्षणाच्या सुचित धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती,मागास व भटका समाज असल्याने एसटी सूची त्याचा समावेश केला. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. आज 75 वर्षानंतर देखील त्याच अंमलबजावणीसाठी लढा देण्याची वेळ आली.
भविष्यात देखील यापेक्षा तीव्र लढा उभा करावा लागेल.अॅड बापू मेटकरी म्हणाले की, ज्याप्रमाणे धनगर आरक्षणावरून राज्यकर्ते सत्तेत आले त्याप्रमाणे हा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यांना सत्तेबाहेर खेचू शकतो याची जाणीव सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.त्यावेळी विजय होनमाने, बाळासाहेब वाघमोडे, यांची भाषणे झाली, मागण्याचे निवेदन तहसीलदार मदन जाधव यांनी स्वीकारले पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी यावेळी कडेकट बंदोबस्त तैनात केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.