Dhangar Community Agitation sakal
सोलापूर

Dhangar Reservation : आरक्षणासाठी धनगर बांधवांचा मंगळवेढ्यात रास्ता रोको

पंढरपूर व लातूर येथे मागील 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून शासनाने लक्ष न दिल्याने महाराष्ट्रातील धनगर जमातबांधवांच्या भावना तीव्र होत आहेत.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - धनगर जमातीला अनुसूचित जमाती (ST) चे जात प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय काढण्यासाठी येथील येथील धनगर समाज बांधवांनी दामाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करून मागणीचे निवेदन तहसीलदार मदन जाधव यांना देण्यात आले.

यावेळी दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, जिल्हा नियोजन सदस्य प्रदीप खांडेकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविकिरण कोळेकर,अड बापू मेटकरी, अंकुश पडवळे,सरपंच शिवाजी सरगर, विठ्ठल सरगर, धनाजी बिचुकले नंदकुमार कोळेकर महादेव इरकर अविनाश मेटकरी, गेना दोलतोडे, राहुल ढेकळे, राजू गाढवे, धनाजी गडदे, गुलाब थोरबोले, महावीर ठेंगील, हणमंत मासाळ, अॅड. विक्रमसिंह मासाळ, बाळासो वाघमोडे, आबा खांडेकर बंडू वाघमोडे आदी सह तालुक्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 1956 साली अनुसूचित जमातीच्या यादीत 'धनगड' नावाची जमात दाखल करण्यात आली, ज्यामुळे धनगर जमात गेल्या 68 वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिला. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की, 'धनगड' जमात अस्तित्वात नाही, मात्र 'धनगर' जमात अस्तित्वात आहे.

पंढरपूर व लातूर येथे मागील 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून शासनाने लक्ष न दिल्याने महाराष्ट्रातील धनगर जमातबांधवांच्या भावना तीव्र होत आहेत. तर पंढरपूरात आंदोलनादरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत, मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले. आत्तापर्यंत अनेक सरकारने धनगर जमातीची केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून दिशाभूल केली. महाराष्ट्र शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा अशी मागणी निवेदनात नमूद केली. यावेळी अॅड. रविकिरण कोळेकर, अंकुश पडवळे, अॅड. बापू साहेब मेटकरी आदींनी मनोगत व्यक्त केले.

आदिवासी समाज बांधवांसाठी विशेष असं आरक्षण दिलेला असताना भारतामध्ये धनगर समाज बांधवांना 36 नंबरच्या धनगर इंग्लिश मध्ये (औरन) हा एकच शब्द असून परंतु शब्दछल करून एनटीचा प्रवर्ग नसताना देखील जाणून-बजून एनटी प्रवर्ग तयार करून एसटीचा आरक्षण संपवण्याचा घाट घालून महाराष्ट्रातल्या प्रस्थापित असणाऱ्या राजकीय पक्षाने जाणून-मधून केले.

- अॅड. विक्रमसिंह मासाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT