dhangar reservation Bhandara thrown at bjp leader Radhakrishna Vikhe Patil at solapur political news  
सोलापूर

Dhangar Reservation : आता धनगर आरक्षण पेटणार का? राधाकृष्ण विखे पाटलांवर कार्यकर्त्यांनी उधळला भंडारा

रोहित कणसे

Dhangar Reservation News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर येथे शासकिय विश्रामगृहात हा प्रकार घडला. अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने धनगर समाजातील बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. .

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण अद्याप त्यावर मार्ग निघालेला नाही. आता पालकमंत्री विखे पाटील सोलापूर दौर्‍यावर आहेत. आज शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातील भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळत आरक्षण देण्याची घोषणा दिल्या.

शहराध्यक्षांची लाथा बुक्क्यांनी मारहाण

राधाकृष्ण विखे पाटील निवेदनाचे वाचन करत असताना बंगाळे यांनी सर्वांचीच नजर चुकवून खिशातील भंडारा काढून पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर टाकला व घोषणा दिल्या. त्यावेळी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह सुरक्षारक्षक यांनी बंगाळे यांना मारहाण केली. नंतर पोलिसांनी बंगाळे यांना ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirol : उद्यानसम्राट आमदारकीच्या आखाड्यात! राजू शेट्टींच्या घरच्या मतदारसंघात काँग्रेसने खेळला हुकमी एक्का

तिच्यासारख्या लोकांसोबत... जेव्हा अमृता सिंगने रवीना टंडनला दिलेली शिवी; सैफ अली खान ठरलेला कारण

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

Jayashree Thorat : जयश्रीताई आमच्या मुलीसारख्या... कडक कारवाई होणार...भाजप नेत्याच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल पक्षाची स्पष्ट भूमिका

Amit Thackeray: दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत... अमित ठाकरेंनी विषयच संपवला! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT