धवलदादा... हे बी आव्हान हाय बरं का ! Canva
सोलापूर

धवलदादा... हे बी आव्हान हाय बरं का !

धवलदादा... हे बी आव्हान हाय बरं का !

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर जिल्ह्यात फकस्त शहर मध्यपुरती राह्यलेल्या कॉंग्रेसला "अच्छे दिन' येणं म्हंजी आता हे एक सपानंच हाय म्हना ना...

चला एक मात्र बरं झालं... धवलदादांनी "पण' उचलला हाय... कॉंग्रेसमधलं (Congress) सर्व गट-तट मोडीतच काढतुया बगा तर... असं म्हटलं... सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) फकस्त शहर मध्यपुरती राह्यलेल्या कॉंग्रेसला "अच्छे दिन' येणं म्हंजी आता हे एक सपानंच हाय म्हना ना... सद्यातरी कॉंग्रेसला कात टाकायला लईच कष्ट उपसावं लागणार हाय... राज्याच्या कारभारात ताईला पक्षानं कार्याध्यक्षपद दिलं हाय... तरी पन सोलापूर जिल्ह्यातली परिस्थिती बगितली तर कॉंग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी कार्यकर्त्यांमदी इस्वास जोडावा लागणार हाय... पक्षातूनच लागलेल्या सुरुंगाला थोपवावं लागणार हाय... तशातच अकलूजच्या (Akluj) दादाला अध्यक्षपद मिळाल्याची जमेची बाजू हाय...

पानीवकरांचा इरोध हुताच... सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्यांकडनं काय लाभ मिळणार नसल्याचं समजल्यानं अकलूजचं धवलदादा थेट लातूरमार्गे कामाला लागलं... तवा श्रेष्ठींनी त्यांच्या नावाचा इचार केला... अन्‌ त्येंना पद दिलं... साखर पट्ट्यात कुटंबी कॉंग्रेस नाय... अक्कलकोट मतदारसंघात असलेल्या कॉंग्रेसनं गेल्या निवडणुकीत अखेरची घटका मोजली... तिथंबी ते सचिनदादा अजून किती वरषं तळ ठोकतंया हे ठाव नाय... राखीपौर्णिमेला लईच भगिनींनी त्येंना राखी बांधल्याचं सोसल मिडीयात झळकलं. तर इकडं दक्षिण सोलापूर मतदारसंघात दोन निवडणुका झालं कॉंग्रेसला यशानं हुलकावणी दिली हाय... त्ये बापू काय जमू देत नाय... डॉ. हविनाळे तर म्हंत्यात अजून 50 वरषे तरी दक्षिणला भूमिपुत्र आमदार होणं अवघड हाय... त्यातंच ताई मध्यमधून निवडून येण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागत्यात असं सांगितलं जातंया...

कॉंग्रेस भवनात धवलदादा पदभार घेत हुतं... तवा राजकारणात लईच माहीर असलेल्या अक्कलकोटचं अण्णानं व्यासपीटाकडं बगतंच हितंच पायात पाय घालणारं बसल्यात असा बॉम्बगोळाच टाकला. त्यावर त्ये वकील असलेलं आपलं रामहरीअप्पा म्हटलं... असलं लोक कवाच मोट्टं हुत नायत. यावर दादांनी टिप्पण्णी केली... या अशा गट-तटाला आपण मोडून काडणार... मोहिते-पाटीलांना गट-तट तसं नवं नाय... जिल्ह्यात एकेकाळी मोहिते-पाटील गटाचा वरचस्मा हुता... आता परत एकदा मोहिते-पाटीलांकडं अध्यक्षपदाची सूत्रं गेल्यानं जिल्ह्यात कॉंग्रेसला चांगले दिवस येतील असं कार्यकर्त्यांचं म्हणणं हाय...

धवलदादा हे प्रतापसिंहांचे म्हंजी ते आपलं पप्पांचं वारसदार... आई पद्मजादेवी म्हंजी आपल्या वहिनीसायब पाठीशी हायती... त्यातंच जनसेवा संघटनेचं जाळंबी हाय... तरुणांची फळी मदतीला हाय... त्यामुळं खरं तर दादाला कामाला लईच चांगली संधी हाय... पण इकडं कॉंग्रेसमदी पाय ओढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीया... त्येचं काय? असा प्रश्‍न सर्वांनाच पडलाय... सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणार पक्ष म्हनूनशान कॉंग्रेसची परंपरा व विचार हाय... त्ये जपण्यासाठी काम करावं लागतंया... हे मात्र नक्की !

- थोरले आबासाहेब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT