मोकाट कुत्र्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये वाद sakal
सोलापूर

Solapur : सोलापुरात मोकाट कुत्र्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये वाद; प्रकरण थेट पोलिस चौकीत

मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोकट कुत्र्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. शेजाऱ्यांमधील वाद वाढल्याने शेवटी हे प्रकरण विजापूर नाका पोलिस चौकीपर्यंत गेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोकट कुत्र्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. शेजाऱ्यांमधील वाद वाढल्याने शेवटी हे प्रकरण विजापूर नाका पोलिस चौकीपर्यंत गेले आहे.

विजापूर रोडवरील आदित्य नगर शेजारी नव्याने तयार झालेल्या गणेश नगर सोसायटीत मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ सार्वजनिक उपद्रव व त्रास इथपर्यंत ही बाब न थांबता मोकाट कुत्र्यांमुळे भांडणे होण्यास सुरवात झाली आहे.

मोकाट कुत्र्यांना नियमितपणे खायला घातल्याने ही भटकी कुत्रे संबंधितांच्या घरासमोर फिरतात खातात मात्र शेजाऱ्यांच्या घरासमोर घाण करतात. दररोजच्या या त्रासाला कंटाळून संतप्त झालेल्या दुसऱ्या शेजाऱ्याने अनेकदा खाऊ घालणाऱ्या शेजाऱ्याला समजावले मात्र त्यांच्या वागण्यात काहीही फरक न पडल्याने नाइलाजाने कुत्र्यांच्या घाणीमुळे त्रासलेल्या दुसऱ्या शेजाऱ्याने हे प्रकरण विजापूर नाका पोलिस चौकीत नेले.

आगळे-वेगळे असणारे मोकाट कुत्र्यांचे प्रकरण पोलिस चौकीपर्यंत गेल्याने प्रशासनदेखील चक्रावून गेले. मात्र मोकाट कुत्र्यांची बाब ही पालिकेच्या अखत्यारीत असल्याने पोलिसांनी दोघांनाही महापालिकेकडे जाण्याचा सल्ला दिला.

प्राण्यांबाबत धोरण अन् अंमलबजावणीची गरज

महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा व्यवस्थित बंदोबस्त न केल्यानेच शेजाऱ्यांमध्ये वाद होत आहेत शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या निर्बीजीकरणानंतरही वाढत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांबाबत विशेष धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज वर्तवली जात आहे.

संपूर्ण शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री झोपण्याच्या वेळेत त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. महापालिका आयुक्तांनी जातीने लक्ष घालून यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अन्यथा मोकाट कुत्र्यांना महापालिकेत आणून सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- अनिल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते

मोकाट कुत्र्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचेप्रकरण पोलिस चौकीत आले होते. मात्र मोकाट कुत्र्यांचा विषय महापालिकेशी निगडित असल्याने दोन्ही शेजाऱ्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करून महापालिकेच्या माध्यमातून हा विषय सोडवण्यास सांगितले आहे.

- दादासाहेब गायकवाड, पोलिस निरीक्षक, विजापूर नाका पोलिस चौकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT