'डीसीसी'च्या निवडणुकीला 31 मार्चपर्यंत ब्रेक ! Canva
सोलापूर

'डीसीसी'च्या निवडणुकीला 31 मार्चपर्यंत ब्रेक ! सहकार विभागाचा आदेश

'डीसीसी'च्या निवडणुकीला 31 मार्चपर्यंत ब्रेक ! सहकार विभागाचा आदेश : 162 कोटींचा संचित तोटा

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक घ्या, असे म्हणणारा एक गट राष्ट्रवादीत आहे तर आताच निवडणूक नको, निवडणूक झाली तरीही आपल्या हातात बॅंक येणार नाही, असा सांगणारा दुसरा गट होता.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Solapur District Central Co-operative Bank) निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) वेळापत्रकही जाहीर केले होते. येत्या नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये बॅंकेची निवडणूक होईल अशीही दाट शक्‍यता होती. मात्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आदेश काढून सोलापूरसह (Solapur), नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur) आणि बुलढाणा (Buldhana) या चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत त्या टप्प्यावर 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एक विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक घ्या, असे म्हणणारा एक गट राष्ट्रवादीत आहे तर आताच निवडणूक नको, निवडणूक झाली तरीही आपल्या हातात बॅंक येणार नाही, असा सांगणारा दुसरा गट होता. राष्ट्रवादीतील या दोन मतप्रवाहामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक काही काळासाठी पुढे गेली आहे. 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर आता राष्ट्रवादीचे किती संचालक निवडून येऊ शकतात? आणि ज्या संचालकांच्या काळात बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली तेच संचालक पुन्हा येऊ शकतात, अशीही शक्‍यता निर्माण झाल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बॅंकेला मार्च 2021 अखेर 162 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. बॅंकेची शेती व बिगरशेती कर्जाची थकबाकी वसुली करूनच संचित तोटा कमी होणार असल्याने सद्य:स्थितीत शेती कर्जाच्या वसुलीस अडचणी येत आहेत. संचित तोटा भरून काढण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्याबरोबरच सी. आर. ए. आर. ची पूर्तता करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. बॅंकेच्या थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावशाली उपाययोजना करण्यासाठी आणि बॅंक आर्थिक स्थितीत येण्यासाठी बॅंकेवर नियुक्त केलेले प्रशासक आणखी काही कालावधीसाठी कार्यरत असणे आवश्‍यक असल्याचेही मत सहकार विभागाने नोंदविले आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक होणार असल्याने अनेक नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. सहकार विभागाने शुक्रवारी (ता. 27) काढलेल्या आदेशामुळे किमान काही महिने तरी आता बॅंकेच्या निवडणुकीचा विषय आता थांबला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT