सातबाऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी, नाव वाढविण्यासाठी तलाठी भाऊसाहेब / मॅडम 25 ते 50 हजार रुपये घेतात.
सोलापूर : सातबाऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी, नाव वाढविण्यासाठी तलाठी (Talathi) भाऊसाहेब / मॅडम 25 ते 50 हजार रुपये घेतात. पैसे घेऊनही कामे लवकर केली जात नसल्याची तक्रार एकुरके (ता. मोहोळ) (Mohol) येथील ग्रामस्थांनी केली. जिल्हा परिषद (Solapur ZP) सदस्य उमेश पाटील (Umesh Patil) यांनी ग्रामस्थांची ही तक्रार मोबाईलच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांच्यासमोर मांडली. त्या दोन्ही तलाठ्यांची चौकशी केली जाईल, चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांना निलंबित केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले. (District Collector will inquire into the talathi of Mohol taluka)
राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांचा जनता दरबार (Janta Darbar) भरविण्यात येत आहे. या अभियानातून सोमवारी सकाळी एकुरके परिसरात नागरिकांचा जनता दरबार झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी गावातील तलाठी श्री. साळुंखे व श्रीमती इंगळे यांनी खातेफोड, नावे लावणे, नावे कमी करण्यासाठी 25 ते 50 हजार रुपये घेतले असल्याची तक्रार केली. तुम्ही एवढे पैसे त्यांना दिलेत? असा प्रश्न उमेश पाटील यांनी ग्रामस्थांना विचारला. ग्रामस्थांनी हो म्हणताच पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी शंभरकर यांना फोन लावला. पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांनी फोन घेतला नाही. परंतु नंतर नागरिकांचा जनता दरबारमध्ये उमेश पाटील यांचे भाषण सुरू असतानाच जिल्हाधिकारी शंभरकर यांचा फोन आला. हा फोन स्पीकरवर टाकत उमेश पाटील यांनी ग्रामस्थांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीला प्रतिसाद देत या दोन्ही तलाठ्यांची चौकशी करू, त्यात तथ्य आढळल्यास दोघांनाही निलंबित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांचा जनता दरबार उपक्रम हाती घेतला आहे. तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न या माध्यमातून सोडविले जात आहेत. अक्कलकोट (Akkalkot) व दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यानंतर आता मोहोळ तालुक्यात हा उपक्रम राबविला जात आहे. मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात मी स्वत: जाऊन नागरिकांचा जनता दरबार या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे.
- उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.