Students 
सोलापूर

ज्ञानेश्वरी पाटील शंभर टक्‍क्‍यांसह मंगळवेढा तालुक्‍यात प्रथम 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्‍याच्या निकाल 97.60 टक्के लागला. निम्म्याहून अधिक शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालाचा टक्का 13 टक्‍क्‍यांनी वाढला. शहरातील इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेतील ज्ञानेश्वरी पाटील हिने शंभर टक्के गुण मिळवून तालुक्‍यात पहिली आली आहे. 

गतवर्षीच्या निकालामध्ये तालुक्‍याचा निकाल 84.51 टक्के होता. शिवाय 12 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. मात्र यंदा त्यात वाढ होऊन 30 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. मार्च 2020 मध्ये घेतलेल्या परीक्षेत तालुक्‍यातून 3458 नोंदणी केली. त्यापैकी 3426 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 3344 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्‍यातील एकूण निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 1742 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर 1123 विद्यार्थी अ श्रेणीत, 409 विद्यार्थी ब श्रेणीत, 70 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍याचा शैक्षणिक आलेख उंचावला होता. गतवर्षी दहावीच्या निकालाचा आलेख घसरला होता. मात्र यंदा त्यात वाढ झाली आहे. 

तालुक्‍यातील विद्यालयनिहाय निकाल टक्‍क्‍यांमध्ये : इंग्लिश स्कूल मंगळवेढा 98.39, जवाहरलाल शेतकी हायस्कूल मंगळवेढा 88.33, श्री संत दामाजी हायस्कूल मंगळवेढा 94.44, विद्यामंदिर हायस्कूल सलगर बु. 97.54 , इंग्लिश स्कूल भोसे 98.26, सिद्धेश्वर विद्यामंदिर माचणूर 98.70, महालिंगराया हायस्कूल हुलजंती 97.29, कामसिद्ध विद्यालय खुपसंगी 95.23, माध्यमिक आश्रमशाळा हुन्नूर 95.45, इंग्लिश स्कूल निंबोणी 98.64, संगम विद्यालय डोंगरगाव 95.00, गणेश विद्यालय गणेशवाडी 87.09, स्वामी विवेकानंद विद्यालय गोणेवाडी 97.77, विलासराव देशमुख प्रशाला कारखाना साईट 98.48, माध्यमिक हायस्कूल अरळी 98.43, भैरवनाथ विद्यालय शिरनांदगी 94.44, केंद्रीय निवासी विद्यालय तळसंगी 72.89, रेवणसिद्ध स्वामी विद्यालय तळसंगी 96.86, प्राथमिक आश्रमशाळा पडोळकरवाडी 96.87, सर्वोदय माध्यमिक विद्यालय शिवनगी 97.14. 

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा 
सदगुरू बागडे महाराज विद्यालय बावची, विद्यानिकेतन विद्यालय जालिहाळ-हिवरगाव, रामकृष्ण टाकले माध्यमिक विद्यालय धर्मगाव, नूतन हायस्कूल बोराळे, हनुमान विद्यामंदिर मरवडे , विद्यामंदिर हायस्कूल लक्ष्मी दहीवडी, बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर, पोस्ट बेसिक आश्रमशाळा बालाजीनगर, लक्ष्मीदेवी विद्यामंदिर रड्डे, कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, ताराबाई गर्ल्स हायस्कूल मंगळवेढा, बाळकृष्ण विद्यालय भाळवणी, महाराणी महासिद्ध विद्यामंदिर डोणज, आश्रमशाळा येड्राव खवे, सिध्दनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे, मातुर्लिंग विद्यालय सिद्धापूर, शारदा विद्यामंदिर पाठखळ, कै. श्रीपतराव माने हायस्कूल लवंगी, वेताळ विद्यामंदिर शिरसी, कै. लक्ष्मणदादा आकळे माध्यमिक विद्यालय हाजापूर, एम. पी. मानसिंगका विद्यालय व ज्यु. कॉलेज सोड्डी, नुतन मराठी माध्यमिक विद्यालय मंगळवेढा, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम मंगळवेढा, छत्रपती शिवाजी विद्यामंदिर खोमनाळ, शरणबसवेश्वर विद्यामंदिर नंदूर, स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव, जुनोनी माध्यमिक विद्यालय जुनोनी, शरदचंद्र पवार विद्यालय मल्लेवाडी, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम आणि मराठी माध्यम मंगळवेढा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT