do along with congress symbol and ncp symbol campaign name says politics sakal
सोलापूर

Solapur : पंजासोबत तुतारी चिन्हाचाही करा प्रचार; राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सुशीलकुमार शिंदेंची भेट; निरीक्षक माने

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तुमच्या भागात रॅली व बैठकीचे नियोजन करावे. लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करुया. काँग्रेसच्या हाताचा पंजा चिन्हाचा प्रचार करत असताना आपली राष्ट्रवादीचे चिन्ह (तुतारी वाजविणारा माणूस) देखील घेऊन जाणे गरजेचे आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला शहर उत्तर मधून त्याचा फायदा होईल. महापालिकेच्या निवडणुकीसाठी तुतारी चिन्ह घरोघरी पोचविण्यासाठी मदत होईल असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा निरिक्षक शेखर यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, भारत जाधव, यु. एन. बेरिया, नलिनी चंदेले, सुनीता रोटे, चंद्रकांत पवार, शंकर पाटील, जनार्दन कारमपुरी, प्रशांत बाबर, अक्षय वाक्से, सरफराज शेख, प्रतीक्षा चव्हाण, वारिस कुडले, जावेद शिकलकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्वांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी जावेद खरादी, अक्षय जाधव, लक्ष्मण भोसले, दिनेश शिंदे, गोविंदराज एकबोटे, सिकंदर गोलंदाज, महादेव गवळी, सारिका नारायणकर, सुनीता गायकवाड, नसीमा शेतसंदी, संजीवनी कुलकर्णी, अजित बनसोडे, सिद्धार्थ सर्वगोड, सनी म्हेत्रे, राहुल बोळकोटे, सूर्यकांत शेरखाने, व्ही. डी. गायकवाड, सोपान खांडेकर, शशिकला डंकापुरे, अजित पात्रे, औदुंबर जगताप, ईश्वर अहिरे, तानाजी मसलकर, राजू शिंदगणे, सचिन कदम, रुक्मिणी नागणे, प्रमिला बिराजदार, मुसा आत्तार, बिराप्पा बंडगर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT