Child_Corona Canva
सोलापूर

"लहान मुलांमध्ये कोरोना गंभीरतेचे प्रमाण अत्यल्प ! कोरोनामुक्त मुलांना मात्र "पीआयएमएस'चा धोका'

डॉक्‍टर म्हणतात की लहान मुलांमध्ये कोरोना गंभीरतेचे प्रमाण अत्यल्प

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत (second and third waves of Corona) लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात असले तरी, सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाग्रस्त लहान मुलांमध्ये गंभीरतेचे प्रमाण हे अत्यल्प आहे. साध्या उपचारानंतरही लहान मुलं कोरोनामुक्त (Coronafree) झाली आहेत. त्यामुळे पालकांनी न घाबरता वेळीच उपचार केले तर कोरोनाचा धोका टाळता येतो, अशी माहिती येथील बालरोगतज्ज्ञ ओजस देवकते (Pediatrician Ojas Devkate) यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. (Doctor Ojas Devkate say the severity of corona in young children is extremely low)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. लहान मुलांपेक्षा तरुण आणि वयोवृद्ध लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता लहान मुलांमध्येही कोरोनाचे प्रमाण अधिक वाढू लागले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केल्यानंतर केंद्र सरकारने टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पालकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बालरोगतज्ज्ञ ओजस देवकते यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी लहान मुलांमध्ये गंभीरतेचे प्रमाण अत्यल्प असल्याचे सांगितले. डॉ. ओजस देवकते यांनी नुकतेच लहान मुलांसाठी कोरोना हॉस्पिटल सुरू केले असून, त्यांनी कोरोनाविषयी पालकांमध्ये जनजागृती देखील सुरू केली आहे.

डॉ. देवकते म्हणाले की, सगळीकडे कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण हे तुलनेने अत्यंत कमी आहे. पंढरपूर तालुक्‍यात सध्या फक्त 12 लहान मुलांवर हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

कोरोनाग्रस्त लहान मुलांना शक्‍यतो ऑक्‍सिजनची गरज लागत नाही. शिवाय लहान मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार होण्याचे प्रमाण देखील खूप कमी आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या लहान मुलांवर घरच्या घरी उपचार करून बरे करता येते. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज नसल्याचेही डॉ. देवकते यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना काळात पालकांनी आपल्या लहान मुलांना विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर वेळोवेळी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार केले तर अगदी कमी खर्चात लहान मुलं कोरोनावर यशस्वी मात करू शकतात.

लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलटी, चिडचिडेपणा वाढणे आदी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास पालकांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मुलांवर औषधोपचार करणे आवश्‍यक असल्याचेही डॉ. देवकते यांनी सांगितले.

लहान मुलांना "पीआयएमएस' या नव्या आजाराचा धोका

कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांमध्ये पीआयएमएस (पेडियाट्रिक इन्फ्लेटमेटरी मल्टिसिस्टीम सिन्ड्रोम) या नव्या आजाराची लागण होण्याची भीती असते. कोरोना होऊन गेल्यानंतर साधारण चार आठवड्यांनी पीआयएमएस या आजाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये ताप येणे, फोड येणे, तोंड लाल होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन हृदयाच्या रक्तवाहिन्या, लिव्हर, किडनी, मेंदू यासह इतर अवयवांना धोका पोचण्याची शक्‍यता असते. दरम्यान, या आजाराचे प्रमाण हे एक टक्‍क्‍यापेक्षा कमी रुग्णांमधून आढळून येते. वेळीच योग्य उपचार केले तर या आजारावरही लहान मुलं यशस्वी मात करू शकतात, असेही डॉ. ओजस देवकते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT