सोलापूर

माजी आमदार गणपतराव देशमुखांची प्रकृती स्थिर; अफवांवर विश्वास ठेवू नका

विनायक होगाडे

सोलापूर: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृतिक काहीसी चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. समाजमाध्यमांत त्यांच्या मृत्यूची पसरलेली अफवा चुकीची आहे. गणपतराव देशमुख हे 94 वर्षांचे असून त्यांच्यावर पित्ताशयाच्या खड्याची शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. ते सध्या सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात आहेत दाखल आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अश्विनी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ मेरकर यांनी दिली आहे.

गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सकाळ पासून चढ उतार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अफवांवर विश्वास ठेवूनये असे आवाहन त्यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख यांनी केले आहे. आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

1962 ते 1995 पर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले. 1995 साली आमदार शहाजी बापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी 2019 पर्यंत आमदार म्हणून काम केेले. 2019 ची निवडणूक त्यांनी न लढवता, नातू डाॅ, अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. परंतु शहाजी बापू पाटील यांच्याकडून अनिकेत यांचा पराभव झाला. रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबा सारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकर्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा आहे. देशातील पहिली महिलांसाठीची सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT